धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीत खलील ताजोद्दीन पठाण सज्ज… राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींना साकडे!
धाराशिव (प्रतिनिधी): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, विविध राज्यातील नगरपरिषदांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली आहे. धाराशिव नगरपरिषद मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार असून, उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे.
धाराशिव नगरपरिषदेत मागील तीन, चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू होती. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी / कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठीकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) कडून प्रभाग क्रमांक चार (सर्वसाधारण पुरुष) या जागेसाठी प्रदेश संघटक सचिव खलील ताजोद्दीन पठाण यांनी आपली उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाकडे मागणी केली आहे!
पठाण हे मागील अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणी असून, समाजकार्य क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. गालिब नगर, सुलतानपुरा भागातील पाण्याचे खड्डे बुजवणे, पावसाळ्यात साचलेले पाणी काढण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, तसेच पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत.
सतत सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असलेले खलील पठाण हे जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाशी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून त्याच कामाच्या जोरावर आता त्यांनी धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला असून, अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
पठाण यांनी प्रभाग क्रमांक चारसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली आहे! त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्यास या प्रभागातील निवडणूक चुरशीची तसेच प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












