धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – दैनिक एकमतच्यावतीने देण्यात येणारा राजकीय व सामाजिक जिल्हास्तरीय पुरस्काराने शिवसेनेचे धाराशिव तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांना दि.२४ ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात आले.
धाराशिव येथील आर्यन फंक्शन हाॅलमध्ये या पुरस्काराचे वितरण , ज्येष्ठ सामाजिक नेते पन्नालाल सुराणा, आमदार प्रविण स्वामी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, दैनिक एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर, नितिन तावडे, सुभाष कोळगे, मंगेश देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी दैनिक एकमतचे जिल्हा प्रतिनिधी मच्छिंद्र कदम, सुभाष कदम आदींसह इतर उपस्थित होते. याबद्दल लाकाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.













