लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी २ कोटी ८ लाखांची जागा विनामूल्य – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांना यश!
समाजाच्या वतीने नगरसेवक विलास लोंढे यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे आभार मानले
धाराशिव दि.२८(प्रतिनिधी):साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारणीसाठी शासनाच्या दूध डेअरीची एक एकर जागा — ज्याची शासकीय किंमत तब्बल ₹२ कोटी ८ लाख — महायुती सरकारने विनामूल्य मंजूर केली आहे. हा ऐतिहासिक निर्णय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला असून, या निर्णयामुळे संपूर्ण मातंग समाजात आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. अण्णाभाऊ साठे हे शोषित-वंचित समाजाचा बुलंद आवाज होते. त्यांच्या विचारांना व कार्याला कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्यासाठी उभारण्यात येणारे हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा जाहीर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी नगरसेवक विलास (बापू) लोंढे, सुनील काळे, माजी नगरसेवक बापू पवार, किसन पेठे, काका पेठे, खंडू चांदणे, महेश देडे, अजय चव्हाण, पप्पू कांबळे, पंकज चव्हाण तसेच समाजातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा निर्णय केवळ जागा उपलब्ध करून देणारा नसून सामाजिक न्याय, सांस्कृतिक वारसा व लोकशाही मूल्ये जपणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वामुळे डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक प्रत्यक्षात साकार होत असल्याने समाजातून समाधान व्यक्त होत आहे
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












