धाराशिव, दि. ११ (प्रतिनिधी) :पंचायत समिती भूम येथील मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेले तांत्रिक अधिकारी रवींद्र गोरख राख व सीडीइओ श्रीकृष्ण अर्जुन बांगर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मनरेगा अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. या निवेदनात संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून मनरेगा कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनरेगा कामाच्या संदर्भात राग धरून काही अज्ञात आरोपींनी दोन्ही अधिकाऱ्यांचे वाहन अडवून त्यांना लाकडी दांडा व लोखंडी रॉड वापरून जबर मारहाण केली. या घटनेचा गुन्हा वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून एफ. आय. आर. क्र. 290, दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी नोंदवण्यात आला आहे. सदर हल्ला हा जिवे मारण्याच्या उद्देशाने केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी निवेदनकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आवश्यक संरक्षण द्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.
हा जाहीर निषेधाचा ठराव रोजगार हमी योजना मंत्री, सचिव (मंत्रालय-मुंबई) व आयुक्त रोजगार हमी योजना (नागपूर) यांना माहितीसाठी पाठविण्यात आला आहे.
निवेदनावर माळी एम. ए., जमादार ए. सी. ए., भालेराव ए. के., आव्हाड पी. के., होळी व्ही. आर., वाघमारे जानराव, घाडगे एन. एम., पठाण व्ही. एल., विजय पवार, राहुल लोमटे, सुधीर देडगे, गवळी प्रमोद घोडके, ज्ञानेश्वर जाधव, अंगद पवार, धावडे अमोल, सिद्धार्थ कांबळे, सचिन तेलंगे, शेख एम. एच., शेख अमीर, शेख आयाज, पवार यास, जाधव के. वाय., दूधभाते डी., पवार एम. एस., कांबळे थोरात, मस्के एस., सौदागर, सातपुते यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












