तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचा दणका
तुळजापूर दि.२२(प्रतिनिधी):शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात कायदा-सुव्यवस्थेची विशेष खबरदारी घेत असताना, दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या कारवाईत धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकथ आमना यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धडाकेबाज मोहीम राबवली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व सचिन खटके यांच्या पथकाने नवरात्रोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालत असताना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, नळदुर्ग–तुळजापूर बायपास रोडवर पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काही इसम दरोड्याची तयारी करत थांबले आहेत.
मिळालेल्या माहितीवरून सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास पथकाने बायपासवर छापा टाकला. तेथे एमएच 11 ए के 9621 या क्रमांकाची पांढरी शिफ्ट कार उभी दिसली. पोलीस पाहून कारमधील दोन इसम पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना गाठून पकडण्यात आले. कारमधील उर्वरित तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.
सदर इसमांची विचारपूस केल्यावर त्यांनी आपली नावे अशी सांगितली :
रोहित उर्फ तात्या अंकुश गायकवाड (36, सुभाष कॉलनी, बीड)
अमर आसाराम गायकवाड (23, नाळवंडी नाका, बीड)
राजेश अभिमान जाधव (27, फाटा, ता. बीड)
राजाभाऊ ज्ञानदेव यादव (25, वांगी, ता. बीड)
प्रशांत दिलीप डाके (25, स्वराज्य नगर, बीड)
त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता काहींवर याआधी दरोड्याची तयारी, चोरी तसेच खून यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. कारची तपासणी करताना पोलिसांना लोखंडी धारदार कोयता मिळाला.
सदर आरोपींविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 349/2025 भा. दं. सं. कलम 399, 402 तसेच शस्त्र अधिनियम 4/25 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपकथ आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पो. हे. कॉ. विनोद जानराव, पोलीस हवालदार समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, दत्ता राठोड, दया गादेकर, नितीन जाधवर, बबन जाधवर, शोभा बांगर, पो. कॉ. यादव, आंधळे, पो. हव. महेबुब अरब, सुभाष चौरे, विनायक दहीहंडे आदींच्या पथकाने केली.
या धडाकेबाज कारवाईमुळे तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव काळात संभाव्य गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












