वयोवृद्ध शेत वस्तीवर राहणाऱ्या लोकांवर दरोडा घालणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने केले गजाआड.”
दि 07.01.2026 रोजी रात्री कविता ज्ञानदेव कसबे रा. उपळा शिवार यांच्या शेत वस्तीवरील राहते घरी अज्ञात आरोपींनी घुसून त्यांना मारहाण करून सोन्याचे दागिने चोरी केले होते सदर बाबत पोस्टे धाराशिव ग्रामीण गुरनं बर 05/2026 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना तात्काळ तपास करून नमूदचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.दिनांक 10.1.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी सुदर्शन कासार व पथक यांना गोपनीय बातमीदारा मार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी बाबत माहिती प्राप्त झाली. पथकाने मिळालेल्या बातमीवरून मोहा, ता कळंब येथील पारधी पिढीवर छापा टाकून 04 संशयित ताब्यात घेतले. नमूद आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच दिनांक 17.12.2025 रोजी विमानतळ परिसर धाराशिव येथे दरोडा टाकला असल्याची तसेच, गोळेगाव ता वाशी, अंतरवली ता भूम या ठिकाणीही चोरी केली असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून नमूद गुन्ह्यातील 16.2 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत. तसेच नमूद आरोपीकडून चोरीच्या 04 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या, शिर्डी व जामखेड येथील आहेत. अशाप्रकारे स्थानिक गुन्हे शाखेने नमूद आरोपीकडून दरोडा, जबरी चोरी आणि मोटरसायकल चोरीचे एकूण 08 गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण 02,07,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे- अनिल उर्फ लल्ल्या बादल शिंदे, छगन श्रीपती काळे, बिभीषण उर्फ बबड्या दिलीप काळे, विजय उर्फ तुंबड्या आप्पा पवार सर्व रा मोहा ता. कळंब जि धाराशिव अशी असून नमूद आरोपी आणि जप्त मुद्देमाल यांना पुढील कारवाई कामी पोस्ट धाराशिव ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच यातील आरोपी धाराशिव आणि बाहेर जिल्ह्यातील दरोडा जबरी चोरी सारख्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार,पोह/ शौकत पठाण, पोह/ जावेद काझी, पोह/ प्रकाश औताडे, पोह/ फरहान पठाण, मपोह/ शोभा बांगर, चापोह/ रत्नदीप डोंगरे, चापोह नवनाथ गुरव यांनी केली आहे.












