लोकमदत न्यूजची भविष्यवाणी खरी ठरली!
महायुतीकडून नेहा काकडे तर महाविकास आघाडीकडून संगीता गुरव; दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म दाखल!
धाराशिव दि.१८ नोव्हेंबर (अमजद सय्यद) :धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला होता. कोणत्या पक्षाकडून कोणत्या महिलेला अधिकृत उमेदवारी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर 06 ऑक्टोबर 2025 रोजी लोकमदत न्यूजने केलेल्या विशेष विश्लेषणात महायुतीकडून भाजपच्या सौ. नेहा राहुल काकडे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या सौ. संगीता सोमनाथ गुरव हे दोन सर्वात प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. सोमवारी दिनांक 17 नोव्हेंबर 2025, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, लोकमदत न्यूजची भविष्यवाणी अचूक ठरली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी याच दोन नावांवर अधिकृत मोहोर उमटवत एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. त्यामुळे पुढील नगराध्यक्षपदावर थेट लढत नेहा काकडे विरुद्ध संगीता गुरव यांच्यात होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून सौ. नेहा राहुल काकडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव पक्षांतर्गत सर्वाधिक चर्चेत होते. पक्षातील वरिष्ठांची पसंती, कार्यकर्त्यांचा समर्थनाचा ओघ आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मल्हार पाटील यांचे पाठबळ यामुळे त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे.
तर महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या सौ. संगीता सोमनाथ गुरव यांच्यावर विश्वास दाखवला आहे. दोन टर्म नगरसेवक राहिलेले आणि सध्या शहरप्रमुख असलेल्या सोमनाथ गुरव यांच्या कार्याचा लाभ त्यांना मिळाला असून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांचे पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवारीला मिळाले आहे.
06 ऑक्टोबर रोजी लोकमदत न्यूजने केलेल्या सखोल आणि अचूक विश्लेषणातील दोन्ही प्रमुख दावेदार प्रत्यक्षात अधिकृत उमेदवार म्हणून समोर आल्याने लोकमदत न्यूजच्या वृत्तांकनाला आज अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786















