लोकमदत न्यूजचा दणका : अवघ्या दोन तासांत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून अनधिकृत बॅनर हटवले!
नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ कारवाई करून घेतला मोकळा श्वास
धाराशिव (प्रतिनिधी) –“लोकमदत न्यूज”ने अनधिकृत बॅनरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गजबजला या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. अवघ्या दोन तासांच्या आत नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व अनधिकृत बॅनर आणि फलक हटवून परिसर स्वच्छ केला.
सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात बॅनर लावले होते. या प्रकरणावर “लोकमदत न्यूज”ने “प्रशासन बघ्याच्या भूमिकेत” असे स्पष्टपणे दाखवून दिल्यानंतर प्रशासन हलले.
नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने कारवाई करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फलक तत्काळ उतरवले. या कारवाईनंतर नागरिकांनी “लोकमदत न्यूज”चे कौतुक करत, “सत्य शोधण्याची ताकद प्रत्यक्षात दिसली!” अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, शहरात अनधिकृत जाहिरातींवर नियमितपणे कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक : अमजद सय्यद – 8390088786














