धाराशिव शहरात मल्हार पाटील यांच्या हस्ते सिमेंट रस्ता व नाली कामांचे उद्घाटन
धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) – शहरातील विकास नगर परिसरातील मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रेटीकरण व नाली बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कामासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सुमारे १ कोटी १ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, ती अडचण या कामामुळे दूर होणार आहे. तसेच या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, मधुकर तावडे, सुनील काकडे, आकाश तावडे, अमोलराजे निंबाळकर, राहुल काकडे, अक्षय ढोबळे, अभिजीत काकडे, विलास लोंढे, बापू पवार, दिनेश बंडगर, धनंजय पाटील, सचिन तावडे, नितीन तावडे, पंकज जाधव, सुशांत सोनवणे यांच्यासह प्रभाग क्र दोनमधील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













