• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! धाराशिवच्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या १०१ देशी गाईंचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण

lokmadat news by lokmadat news
December 13, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
35
VIEWS

अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! धाराशिवच्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या १०१ देशी गाईंचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण

मुंबई : (१३ डिसेंबर):अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्हातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण उजळणार आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीन, उभे पीक आणि गोठ्यातील पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या स्वखर्चातून आणलेल्या १०१ उत्तम प्रतीच्या देशी गाईंचे वितरण रविवारी सायंकाळी ७ वाजता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) संपन्न होणार आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, अवकाळी पावसाच्या तडाख्याने धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले. शेतीसोबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असलेली दूधदुभती जनावरे वाहून गेली किंवा मृत्युमुखी पडली. परिणामी, शेतकऱ्यांचे जीवनचक्र ठप्प झाले. ही वेदना स्थानिक पत्रकारांनी माझ्या पर्यंत पोहोचवताच,  क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. *” संपूर्ण देशभरातून चांगल्या प्रतीच्या देशी गाई शोधून, त्यापैकी गुजरात येथील गीर प्रजातीची गाय आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. या गाईची किंमत 75 ते 80 हजार रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील स्थानिक देशी गाईंपेक्षा हिचे दूध उत्पादन दुप्पट आहे. सध्या देशी  गायींच्या दुधाला सरासरी 80 रुपये इतका दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देखील यातूनच चांगले मिळेल त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार प्राप्त होईल, म्हणून ‘ गीर  ‘ जातीच्या गाई बाधित शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय  घेतला “.*

विशेषतः कळंब, भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका अधिक बसल्याने, या भागातील पशुधन गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, पुन्हा स्वावलंबनाचा मार्ग मिळावा, या उदात्त हेतूने हे वितरण करण्यात येत आहे.

ही केवळ गाईंची भेट नाही, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा दूधाळ आशा, आत्मविश्वास आणि स्वाभिमान परत आणणारी मायेची हमी आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

SendShareTweet
Previous Post

कंपन्यात व बँकामध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना परत द्या – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Next Post

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार!” – ऍड नितीन भोसले भाजपा प्रवक्ता

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार!” - ऍड नितीन भोसले भाजपा प्रवक्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT