रिंग रोडवर महापालिकेची धडक कारवाई – ६०० किलो बंदीचे प्लास्टिक जप्त…५ हजारांचा दंड
लातूर दि.०५(प्रतिनिधी) :शहरातील बंदी असलेल्या प्लास्टिकविरुद्ध महापालिकेच्या स्वच्छता विभागाने गुरुवारी रिंग रोड परिसरात मोठी कारवाई केली. आयुक्त श्रीमती मानसी मॅडम यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त वसुधा फड, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलिम शेख आणि क्षेत्रीय अधिकारी रवि कांबळे यांच्या उपस्थितीत प्लास्टिक वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर अचानक छापा टाकण्यात आला.
कारवाईत एकूण ४३ बॉक्सेसमध्ये सुमारे ६०० किलो बंदीचे प्लास्टिक आढळून आले. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांवर ५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेत मुख्य स्वच्छता निरीक्षक धोंडीराम सोनवणे, शिवराज शिंदे, अक्रम शेख, स्वच्छता निरीक्षक प्रदीप गायकवाड, अशिष साठे, महादेव फिस्के यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी सहभागी झाले.
महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला चालना मिळाली असून पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













