• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

कर्तव्यात कसूर, अहवाल सादर – निलंबित पोलिस निरीक्षक शेळके यांच्या अडचणीत वाढ – पोलिस अधीक्षक रितु खोखर

lokmadat news by lokmadat news
October 14, 2025
in क्राईम
0
0
SHARES
250
VIEWS

कर्तव्यात कसूर, अहवाल सादर – निलंबित पोलिस निरीक्षक शेळके यांच्या अडचणीत वाढ – पोलिस अधीक्षक रितु खोखर

धाराशिव दि.१४(अमजद सय्यद):कर्तव्यात कसूर, वरिष्ठाच्या आदेशाचे पालन न करणे, शिस्तीचे पालन न करणे व कर्तव्य न बजावणे, आरोपीला सहाय्य करण्याचा उद्देश असा ठपका धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे निलंबित पोलिस निरीक्षक मारुती शेळके यांच्यावर ठेवला आहे. शेळके हे लाचलुचपत गुन्ह्यात आरोपी असुन ते निलंबित आहेत. येडशी येथील कालिका ढाबा येथे वेटर म्हणुन काम करणाऱ्या मुकुंद कसबे मृत्यु प्रकरणात आरोपीला त्यांनी मदत केल्याचा त्याच्यावर ठपका आहे, शेळके हे या गुन्ह्यात तपास अधिकारी होते.

पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी आपल्या अहवालात शेळके यांच्यावर अनेक मुद्यावर ठपका ठेवत तो अहवाल छत्रपती संभाजीनगर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे. त्यावर चौकशी होऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे खोखर यांनी सांगितले.

मुकुंद कसबे मृत्यु प्रकरणात 2 वेगवेगळ्या कहानी समोर आल्या असुन पहिल्यादा अकस्मात मृत्यू तर त्यानंतर 15 महिन्यांनी तो ‘अपघात’ असल्याचे नमुद करीत 2 वेगवेगळे गुन्हे शेळके यांनी नोंद केले होते. मात्र अखेर या मृत्युंच कोडं सुटले असुन हॉटेल मालक राहुल देशमुखे याला आनंदनगर पोलिसांनी 304 कलम अंतर्गत अटक केली.
देशमुखे याला कलम 304 ( मृत्यू मात्र ठरवून केलेला/हेतुपूर्वक खुन नव्हे ) 201 ( पुरावा नष्ट करणे ) या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कसबे प्रकरणात देशमुखे तक्रारदार होता मात्र तोच आता आरोपी बनला आहे. या प्रकरणात पुरावे दडवून आरोपीला पाठीशी घातल्याची माहिती कळताच दैनिक समय सारथी वृत्तपत्राने पाठपुरावा केला होता, त्या पाठपुराव्यानंतर यातील ‘सत्य’ समोर आले आहे. पोलिस निरीक्षक शेळके व इतर काही जन यात रडारवर आहेत.

21 मार्च 2024 रोजी येडशी येथील हॉटेल कालिका ढाबा येथे वेटर मुकुंद माधव कसबे (रा मोहा, ता कळंब) हा काम करीत होता. काम करीत असताना ढाब्यासमोर सिमेंट काँक्रेटवर पडून कानातुन रक्त आल्याने त्यास रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले व 23 मार्चला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला अशी तक्रार राहुल बाळासाहेब देशमुखे यांनी दिली त्यावरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची मयत क्रमांक 17/24 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे नोंद घेण्यात आली. त्यावेळी कोणावरही संशय तक्रार नसल्याचा जबाब हॉटेल मालक राहुल देशमुख यांनी दिला.

देशमुखे यांना घटनेच्या तब्बल 1 वर्ष 3 महिन्यांनी साक्षात्कार झाला व त्यांनी धाराशिव ग्रामीण पोलिसात 2 जुन 2025 रोजी फिर्याद दिली की, मला आज रोजी ढोकी येथील धनराज किसन कांबळे यांचेकडुन माहिती झाले की, मुकुंद कसबे हा ढाब्यासमोरील उड्डाण पुलाजवळ लातुर ते बार्शी रोडवर गेला असताना बार्शीकडुन येणारे एका मोटर सायकलने त्यास जोराची धडक दिली त्यामुळे तो खाली पडला. त्यानंतर तो पडलेल्या ठिकाणाहुन उठून ढाब्याकडे चालत आला व काँक्रेटच्या कोब्यावर पडल्याने कानातून रक्त आले. त्यावेळी मला तो काँक्रेटवर पडल्याने रक्त येऊ लागले असे वाटल्याने मी व लक्ष्मण जाधव त्यास दवाखान्यात घेऊन गेलो व उपचारानंतर त्याचा मृत्यु झाला म्हणुन भादवी कलम 304 अ, 279 व मोटार वाहन नियम 187 प्रमाणे 2 जुन 2025 ला गुन्हा नोंद केला.

आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एका आरोपीवर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 95 हजार स्वीकारल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत विभागाने पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांना अटक केली आहे. शेळके लोखंडे या जोडीने एका सहकारी पोलिस महिलेकडुन लाच घेतली हे विशेष.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsउस्मानाबादक्राईमखूनगृहमंत्रीगृहमंत्री देवेंद्र फडणीस महाराष्ट्र राज्यजिल्हाधिकारीदरोडाधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलीसपोलीस अधीक्षकमर्डरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगरहल्ला
SendShareTweet
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत

Next Post

अमरावतीचे आ. प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा…

Related Posts

क्राईम

धाराशिव लाईव्ह चे संपादक सुनील ढेपे यांचा जामीन मंजूर

January 12, 2026
क्राईम

वयोवृद्ध शेत वस्तीवर राहणाऱ्या लोकांवर दरोडा घालणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने केले गजाआड

January 11, 2026
क्राईम

तुळजापूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा नियमित जामीन अर्ज तात्काळ मंजूर ॲड अमोल वरुडकर यांचा महत्वाचा युक्तिवाद आला कामी

January 9, 2026
क्राईम

“तुळजापुरात गुटख्याचा खुलेआम सुळसुळाट कारवाईच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा – 31 जानेवारीला आंदोलन”

January 9, 2026
क्राईम

धाराशिवमध्ये एल सी बी ची अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई 33.95 लाखांचा मुद्देमाल जप्त – एक आरोपी ताब्यात

January 8, 2026
क्राईम

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद…कळंबमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

January 4, 2026
Next Post

अमरावतीचे आ. प्रवीण पोटे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यासाठी एक हात मदतीचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिवसेना उबाठा गटाला धाराशिवमध्ये दोन दिवसांत दुसरा मोठा हाबाडा उपतालुका प्रमुख गफूर शेख यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

January 16, 2026

आकाश कोकाटे यांच्याकडून स्वराज्य ध्वजस्तंभ व शिवजयंती तयारीची पाहणी

January 15, 2026

अंबेहोळमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का विद्यमान उपसरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

January 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT