आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव–कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात “धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम” या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे व स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
धाराशिव नगर परिषद प्रांगणातील छत्रपती शिवाजी नाट्यगृह समोरील मैदानावर ही स्पर्धा सुरू असून एकूण २६ संघांनी सहभाग नोंदविला आहे. विविध भागांतून आलेल्या संघांमध्ये चुरशीचे सामने रंगत असून प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत आहे. नाट्यगृहासमोरील मैदानावर संध्याकाळी सामने सुरू होताच क्रीडाप्रेमींची गर्दी उसळत आहे.
स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक ₹31,044 (प्रवीण कोकाटे), द्वितीय ₹21,044 (प्रवीण केसकर), तृतीय ₹15,044 (राकेश सूर्यवंशी व सुजित बागल), चतुर्थ ₹11,044 (श्वेता दुरुगकर), पंचम ₹5,044 (कै.बाळासाहेब खळदकर), तसेच सातवे, आठवे व नववे प्रत्येकी ₹3,044, दहावे ₹2,024, अकरावे व बारावे प्रत्येकी ₹2,044 अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
या स्पर्धेत येणाऱ्या संघाचे स्वागतोत्सुक अभिराज कदम (युवा सेना शहरप्रमुख) लखन देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे. सामने सुरळीत पार पडावेत यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हॉलीबॉल महासंग्राममुळे शहरातील क्रीडा वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये खेळाविषयी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
लोकमदत न्यूज | सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786














