मल्हार पाटील यांचा शुभविवाह निमित्ताने
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलंय हे नम्र आवाहन…
श्री गणरायाच्या कृपेने, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता, कुलदैवत श्री भैरवनाथ व संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या कृपाशीर्वादाने, धाराशिव जिल्ह्याचे भगीरथ आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांचे नातू आणि माझे चिरंजीव मल्हार व चि. सौ. कां. साक्षी यांचा शुभविवाह योग जुळून आलेला आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटुंबांवर अत्यंत बिकट परिस्थिती ओढवलेली आहे.
जिल्हा आणि परिसरातील आपण सर्वच जन पाटील कुटुंबीयांचा अविभाज्य भाग आहात. त्यामुळेच अतिशय संवेदनशीलपणे विचार करुन हा मंगल सोहळा मर्यादित स्वरुपात पार पाडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र तुळजापुर येथील परिसरात हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांपासून आपला पाटील कुटुंबीयाशी असलेला स्नेह अतूट आहे. या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती शक्य नसली तरीही, आपल्या स्नेहपूर्वक शुभेच्छा, शुभाशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव नवदाम्पत्यावर असणारच आहे. आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादानेच चि. मल्हारच्या वैवाहिक जीवनाची मंगलमय आणि आनंदमय सुरुवात होणार आहे.
यथावकाश जिल्ह्यातील परिस्थिती अनुकुल झाल्यानंतर, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत शुभाशीर्वाद सोहळा व स्नेहभोजन आयोजित केले जाणार आहेच ! तोपर्यंत आपल्या सर्वांचे स्नेह, शुभाशीर्वाद नवदांपत्यांना लाभावे, हीच नम्र विनंती…
– आ.राणाजगजितसिंह पाटील












