९ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत कार्यक्रम
धाराशिव दि.८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) महाराष्ट्र जिला परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार,धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम – २०२५ अंतर्गत सर्व पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार,९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कै.यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद,धाराशिव येथे पार पडणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिक,तसेच इच्छुकांनी वेळेवर व ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












