पठाण अझहरखान जाकेरखान यांचा शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल
धाराशिव दिनांक १५(प्रतिनिधी):नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा जोर वाढत असताना प्रभाग क्रमांक १८ ब मधून इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे युवा उमेदवार पठाण अझहरखान जाकेरखान यांनी शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी,कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अझहरखान यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा उल्लेख करत जनता आपल्या कार्यावर विश्वास ठेवून नक्कीच विजयी करेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला. सुशिक्षित आणि लोकाभिमुख उमेदवार म्हणून प्रभागाचा सर्वांगीण विकास हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे स्थानिक तसेच वरिष्ठ नेते, प्रभागातील मतदार आणि विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रभाग १८ ब मधील निवडणुकीचे पारडे काँग्रेसकडे झुकत असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












