पोलिसांनी दिली शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रे व सायबर गुन्ह्यांची माहिती
धाराशिव शहर पोलीस ठाण्याचा उपक्रम
पोलीस ठाणे येथील माहिती,व सायबर गुन्हे,महिला व बालकांचे विरुद्ध
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) – पोलीस वर्धापन दिनानिमित्त धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पोलीस विभागातील शस्त्रास्त्रे, सायबर, महिला व बालक यांच्या विरुद्ध नोंदविलेले गुन्हे व शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दि.४ जानेवारी रोजी देण्यात आली.
पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हाताळीत असलेल्या शस्त्रे कशी हाताळली जातात? याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी केले. तर शस्त्रांचीची माहिती पोलीस उपनिरीक्षक डीघोळे दिली. यावेळी सहा.पोलीस निरीक्षक अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस उपनिरीक्षक अक्षय दिघोळे, पोलीस अंमलदार अनंतवाड, कनामे, बेग, महिला पोलीस अंमलदार चव्हाण यांच्यासह होमगार्ड उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना विद्यार्थी तसेच पोलीस ठाणे पोलीस ठाण्यातील चालणाऱ्या कामकाज, कारभार व शस्त्रास्त्रांची माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
















