पवनचक्की केबल चोरीचा पोलीस अधिकाऱ्यांनी केला पर्दाफाश !
चोरीमागचे सुत्रधार कंपनीचे अधिकारी !
कंपनीला अंधारात ठेवणारे ते चालाख अधिकारी कोण ?
धाराशिव दि.१९ (अमजद सय्यद) – पवनचक्की कंपनीचे जाळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. त्यामुळे त्यांची अनेक ठिकाणी साहित्य साठवणुकीची मोठी गोडाऊन्स (कॅम्प) आहेत. त्यापैकीच तुळजापूर रस्त्यावरील एम एस इ बी विश्रामगृह समोर असलेल्या पवनचक्की कंपनीचे एका गोडाऊनमधून कॉपर बंडल चोरी झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. मात्र, जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे विशेष तपास स्पेशालिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण करणारे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी तपासाची आपली भेदक नजर फिरविता क्षणीच चोरीचा माल गोडाऊनमध्ये आढळून आला. त्यामुळे तो चोरीचा केलेला बनाव चव्हाट्यावर आला असल्याने अशीही बनवाबनवी करणारे ते पवनचक्की कंपनीतील बंडलबाज अधिकारी कोण ? हे समोर येणार असल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांनी दिली आहे.
धाराशिव-तुळजापूर रोडवरील वडगांव (सि.) रेस्ट हाऊस समोर सरोजीन आर एन सर्व्हिसेस प्रा लि. या पवनचक्की कंपनीच्या साहित्याचे गोडाऊन आहे. यामध्ये कॉपर केबल, पवनचक्कीचे पाते आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले आहे. त्याची चोरी होऊ नये यासाठी १२ सिक्युरिटी गार्ड नियुक्ती करण्यात आलेली आहेत. या गोडाऊनमधील केबल चोरी गेल्याचा साक्षात्कार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दि.२८-२९ मे २०२५ दरम्यान झाला. त्यामुळे त्यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद न करताच पेट्रोलींग करत असताना कंपनी परिसराची छाननी केली. त्यावेळी दि.५ जून रोजी सदरील चोरी गेलेला माल कंपनीच्या गोडाऊनमध्येच लपवून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरण तिथेच थांबले असते, मात्र कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या अधिकाऱ्यांना तो तपास प्रचंड झोंबला. त्यामुळे ते अस्वस्थ झाले त्यांनी पुन्हा काही पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याच चोरी गेलेल्या व सापडलेल्या केबलचा गुन्हा दाखल करण्यास जुलैमध्ये भाग पडले. त्यामुळे कंपनीने ज्या अधिकाऱ्यांवर मुख्य जबाबदारी सोपविलेली आहे ते अधिकारीच कंपनीशी गद्दारी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण या कंपनीमध्ये विविध प्रकारचे असलेले साहित्य हे इतर कुठल्याही कामाला वापरता येत नाही. ते केवळ पवनचक्कीसाठीच वापरता येते, हे माहीत असून देखील ते चोरी झाल्याचा बनाव का करतात ? याच्या खोलात गेल्यास प्रकर्षाने जाणवले की एका कंपनीचे साहित्य दुसऱ्या कंपनीमध्ये बिनबोभाटपणे विकून कोट्यावधींचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु केला आहे. विशेष म्हणजे चोरी गेलेल्या साहित्याची पोलीस केस दाखल झाली तर इन्शुरन्स १०० टक्के मिळण्याची पुरेपूर खात्री असते. ती रक्कम संबंधित पवनचक्की कंपनीला मिळते त्यामुळे कंपनी खुश होते आणि गैरमार्गाने कंपनीचे अधिकारी १०० टक्के चोरीचा बेबनाव करण्यात यशस्वी होतात हेच गमक या अधिकाऱ्यांना जमले असल्यामुळे ते अशा प्रकारचे कार्य करण्यात मश्गुल आहेत. मात्र पोलीस प्रशासन त्यांचा बेबनाव चव्हाट्यावर आणत असल्यामुळे त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची टोळी भेदरली आहे.
सदरील घटनेची बातमी लोकमदत न्यूज मध्ये प्रसिद्ध होताच कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी धाराशिव शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून कंपनीची फसवणूक करून काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्याच अनुषंगाने प्रभारी पोलिस पोलिस निरीक्षक यांनी सदल घटनेचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक दर्जच्या अधिकाऱ्याकडे दिला असून दिनांक १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान पवनचक्की कंपनीच्या व्यवस्थापकास नोटीसद्वारे कंपनीच्या विविध अधिकाऱ्यांची माहिती (डम दाटा) मागविण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी कंपनीच्या दारावर नोटीस धाडताच संबंधित घटनेमध्ये हात काळे केलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे, व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून कंपनीला खड्ड्यात घालणाऱ्या आधीधिकार्यावर पवनचक्की कंपनी कारवाई करणार का? हा देखील प्रश्न आता अनुत्तरीतच राहिला आहे,
जिल्ह्यामध्ये पवनचक्की कंपनीच्या कॅम्पसमध्ये आजपर्यंत झालेल्या चोरीचा सखोल तपास करून कंपनीची फसवणूक करणाऱ्या टोळीस गजाआड करून धाराशिव पोलिस जिल्ह्यातील सर्वात मोठे रॅकेट उघड करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे
भाग दोन
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












