• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धाराशिव नगर परिषदेत मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह महिला नगराध्यक्ष, सत्ताधारी ११ महिला नगरसेविका… तरीही स्वच्छतागृहासाठी महिलांची फरफट!

lokmadat news by lokmadat news
February 16, 2026
in राजकारण
0
0
SHARES
275
VIEWS

धाराशिव नगर परिषदेत मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह महिला नगराध्यक्ष, सत्ताधारी ११ महिला नगरसेविका… तरीही स्वच्छतागृहासाठी महिलांची फरफट!

‘कानफुके रील स्टार’ सभापतींची इतर विभागांत ढवळाढवळ; महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष?

लोकमदत न्यूज | धाराशिव


महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेच्या घोषणा देत सत्तेत आलेल्या धाराशिव नगर परिषद मध्येच महिलांना मूलभूत स्वच्छतागृहासाठी धावपळ करावी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगर परिषदेत तब्बल ४१ नगरसेवक असून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष चे बहुमत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ११ महिला नगरसेविका विजयी झालेल्या असून नगराध्यक्षपदी देखील महिला आहेत. तरीही नगर परिषद इमारतीत महिलांसाठी सुलभ,आणि स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

दररोज विविध कामांसाठी शेकडो महिला नगर परिषदेत येतात. परंतु वॉशरूमची गरज भासल्यास त्यांना सुविधा उपलब्ध होत नाही. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार स्वच्छता समितीच्या कार्यालयाशेजारील एका कोपऱ्यातील खोलीत स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे; मात्र ते ठिकाण आडवळणाला असून कोणतेही दिशादर्शक फलक नाहीत. परिणामी, बाहेरून येणाऱ्या महिलांना ती जागा शोधणे कठीण जाते.
दरम्यान, नगर परिषदेत इतर विभागांमध्ये हस्तक्षेप करणारे आणि नगराध्यक्ष / अधिकाऱ्यांच्या कानात कुजबुज करून वातावरण तापविणारे म्हणून ओळखले जाणारे ‘कानफुके रील स्टार’ सभापती चौथ्या स्तंभावर आक्षेप घेण्यात पुढे असल्याची चर्चा आहे. मात्र महिलांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर त्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही, अशी टीका महिला वर्गातून होत आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा केवळ व्यासपीठापुरत्याच मर्यादित राहणार का? बहुमताची सत्ता असतानाही महिलांसाठी मूलभूत सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात नाहीत? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने स्पष्ट दिशादर्शक फलक लावून स्वच्छतागृह सर्वसामान्य महिलांसाठी खुले करावे, तसेच केवळ कर्मचारी वर्गापुरते मर्यादित न ठेवता बाहेरील महिलांनाही सुविधा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महिला प्रतिनिधित्वाचा अभिमान मिरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता घोषणांपेक्षा कृतीतून संवेदनशीलता दाखविण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी तर कार्याध्यक्ष पदी सुधीर पवार

Next Post

परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गोटात

Related Posts

राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 1, 2026
राजकारण

उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

February 28, 2026
राजकारण

धाराशिव नगर परिषद अर्थसंकल्प २०२६-२७ : प्राधान्य ‘वाहन’ की ‘विकास’?

February 27, 2026
राजकारण

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहन खरेदीसाठी ४० लाखांची तरतूद

February 27, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका सत्ताधाऱ्यांना उशिरा का होईना जाग!
शिवसेना (उ.बा.ठा.) नगरसेवकांचा पुढाकार अजितदादांना सभागृहात पुन्हा श्रद्धांजली

February 27, 2026
Next Post

परंड्यासह उमरग्याचे दोन अपक्ष सदस्य आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गोटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT