रस्ता सुरक्षा अभियानात ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर, पादचाऱ्यांना ‘वॉक ऑन राईट’चे मार्गदर्शन
धाराशिव दि.८ जानेवारी (प्रतिनिधी) रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जिल्हाभर विविध उपक्रम रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दिनांक ०१/०१/२०२६ ते ०८/०१/२०२६ या कालावधीत जिल्हाभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
मांजरा साखर कारखाना परिसरात ट्रॅक्टर-ट्रेलरला रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली. वायुवेग पथक क्र.२ मधील मोटार वाहन निरीक्षक श्री.उदयकुमार केंबळे व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी ट्रॅक्टर-ट्रेलरला रिफ्लेक्टर टेप लावून त्याचे फायदे चालकांना समजावून सांगितले.
तसेच वायुवेग पथक क्र.४ मधील मोटार वाहन निरीक्षक सचिन बंग व सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी वहीर यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावून नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत सूचना व मार्गदर्शन केले.वायुवेग पथक क्र. १ व क्र.३ मधील सुशांत धुमाळे व सहायक मोटार वाहन निरीक्षक सिद्धेश्वर मस्के यांनीही ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावून चालकांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
वरुडा रोड,धाराशिव येथे ‘वॉक ऑन राईट’ बाबत जनजागृती :
धाराशिव शहरातील वरुडा रोड येथे पादचाऱ्यांना ‘Walk on Right’ संकल्पनेबाबत मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे,सहायक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे व कार्यालयीन अधीक्षक नरसिंह कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पादचाऱ्यांना माहितीपत्रके व बॅजचे वाटप करण्यात आले.
तामलवाडी टोल नाका येथे रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन :
तामलवाडी टोल नाका येथे मोटार वाहन निरीक्षक सुनील शिंदे व सहायक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगरे यांनी टोल नाका कर्मचारी,वाहतूक पोलीस कर्मचारी व वाहन चालकांना रस्ता सुरक्षेबाबत प्रबोधन केले.यावेळी बॅनर प्रदर्शित करून माहितीपत्रके वितरित करण्यात आली.
यावेळी वाहन चालकांना वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा,दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे,चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट वापरावा,मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच अपघातग्रस्तांना मदत करावी, याबाबत सविस्तर प्रबोधन करण्यात आले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













