खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा नियमित जामीन अर्ज तात्काळ मंजूर
ॲड अमोल वरुडकर यांचा महत्वाचा युक्तिवाद आला कामी
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) – एका महिलेची सोने घटनेच्या उद्देशाने खून केला असल्याचा आरोप केले खुनाच्या प्रकरणात गोवले होते. मात्र, त्याचा संबंध नसताना त्याला कसे गोवले गेले हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्या आरोपीचा नियमित जामीन अर्ज दि.९ जानेवारी रोजी मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने ॲड अमोल वरुडकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७३/२०२५ कलम १०३ (१) अंतर्गत तुळजापूर येथील एका मुलावर शेजारील महिलेस गाडीत बसवून नेऊन सोने लुटण्याच्या उद्देशाने महिलेचा खून केला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीच्यावतीने ॲड. अमोल वरुडकर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. ॲड. वरुडकर यांनी प्रखर युक्तिवाद करून या गुन्ह्यात आरोपीला कशा प्रकारे गोवण्यात आले आहे ? त्याबाबतचे पुरावे नाहीत हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. ॲड. वरुडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












