आदिवासी पारधी समाजाच्या आरक्षण लढ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचा जाहीर पाठींबा!
धाराशिव:- आदिवासी पारधी समाजाला संविधानाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण दिलेले असतानाही गेल्या काही दिवसांपासून इतर जात-जमाती पारधी समाजाचे आरक्षण हडपण्याचा प्रयत्न करत आहेत या पार्श्वभूमीवर धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ सुरू असलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाने पाठिंबा दिला आहे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी आपल्या पाठिंबाच्या पत्रामध्ये म्हटले आहे की, “आदिवासी पारधी समाजाला मिळालेले आरक्षण हा त्यांचा घटनादत्त हक्क आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेऊ दिला जाणार नाही. समाजाच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) नेहमीच शोषित, वंचित आणि पीडितांसोबत ठामपणे उभी राहील.”
तसेच, पारधी समाजाच्या मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दृष्टीने पाहावे, अन्यथा आंदोलनआणखी तीव्र करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी पाठिंबाच्या पत्रामध्ये दिला आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












