• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धाराशिव शहरात धम्म रॅलीस प्रतिसाद

lokmadat news by lokmadat news
October 4, 2025
in सामाजिक
0
0
SHARES
1
VIEWS

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म रॅलीस प्रतिसाद

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून दि.२ ऑक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचा सजवलेला रथ, ढोल बाजाच्या तालावर लेझीमच्या ठेक्यात आणि युद्ध नको बुद्ध हवा यासह विविध घोषणा देत अतिशय उत्साही वातावरणात धम्म रॅली काढण्यात आली. त्या रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला.

धाराशिव शहरात ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिशा समितीचे सदस्य सिध्दार्थ बनसोडे, माया कंपनीचे संस्थापक बाळासाहेब बनसोडे यांच्यावतीने धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव शहरातील क्रांती चौकातून या रॅलीचा प्रारंभ जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, मध्यवर्ती शिवजयंतीचे संस्थापक प्रकाश जगताप, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, भाजपचे नेते ऍड. व्यंकट गुंड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद दादा बनसोडे, काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद खलील, जनता बँकेचे संचालक आशिष मोदणी, प्रगती बँकेचे चेअरमन प्रशांत पाटील, शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आला. ही रॅली शासकीय जिल्हा रुग्णालय, मारवाड गल्ली, काळा मारुती चौक, पोस्ट कार्यालय, संत गाडगेबाबा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत बँड बाजाच्या तालावर लहान मुली, मुले व पुरुष यांनी लेझीमच्या तालावर व विविध बुद्ध व भीम गीतांच्या ठेक्यावर ताल, लय व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. हातामध्ये पंचशील, निळा ध्वज घेऊन युद्ध नको बुद्ध हवा, तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण धम्ममय झाले होते. यावेळी आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते पुष्पकांत माळाळे, भाजप नेते मेसा जानराव, उदय बनसोडे, राष्ट्रवादी नेते विशाल शिंगाडे, अतुल जगताप, संदीप बनसोडे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, चेअरमन, संतोष बनसोडे, संजय गजधने, सचिन धाकतोडे, प्रसाद बनसोडे, संदीप गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते.  या रॅलीची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि माता रमाई यांच्या स्मृती स्तंभास पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने करण्यात आली. रॅलीच्या यशस्वितेसाठी विश्वजीत बनसोडे, लल्या बनसोडे, सागर बनसोडे, आकाश जानराव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.  या रॅलीमध्ये लहान मुले, मुली, महिला व पुरुष शुभ वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वितेसाठी विश्वजीत बनसोडे, सागर बनसोडे, आकाश जानराव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsडॉ.बाबासाहेब आंबेडकरतथागत गौतम बुद्धधम्मचक्र परिवर्तन दीनधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकबुद्ध विहार
SendShareTweet
Previous Post

Next Post

धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार! राजकीय पक्षांसह शहरवासीयांची उत्सुकता शिगेला

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

धाराशिव शहरातील नगराध्यक्ष पद आरक्षण सोमवारी ठरणार! राजकीय पक्षांसह शहरवासीयांची उत्सुकता शिगेला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT