सम्यक गायकवाड याची विभाग स्तरावर कुस्तीसाठी निवड
धाराशिव :
तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. गावातील सम्यक गायकवाड या विद्यार्थ्याने कुस्ती क्षेत्रात मोठी कामगिरी करत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजय मिळवला आहे. या यशामुळे त्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून, आरळी बु. गावातून विभागीय कुस्ती स्पर्धेत जाणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे.
सम्यकचा मुख्याध्यापक राठोड सर, क्रीडा शिक्षक प्रकाश स्वामी तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या यशामध्ये डबल महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अजित भोसले यांनी तालमीत दिलेल्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे सम्यकने सांगितले.
गावातील विद्यार्थी विभागीय पातळीवर पोहोचल्याने ग्रामस्थ व शालेय परिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडीबद्दल सम्यकचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













