शारदीय नवरात्र महोत्सव – २०२५ श्री तुळजाभवानी देवींची ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास २२ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून आज पाचव्या माळेच्या दिवशी ललिता पंचमी निमित्त रथ अलंकार महापूजा संपन्न झाली. या वेळी भाविकांनी मोठ्या उत्साहाने देवीचे दर्शन घेतले.
धार्मिक आख्यायिकेनुसार भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला होता. त्या परंपरेतून आजही रथ अलंकार अवतार पूजेला विशेष महत्व आहे.
दरम्यान, काल गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी चौथ्या माळेच्या दिवशी मोर वाहनावरून श्री तुळजाभवानी देवींची पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शारदीय नवरात्र उत्सवाच्या उर्वरित दिवसांत दररोज वेगवेगळ्या वाहनांवरून देवीची छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून भाविकांना या सोहळ्याचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकमदत न्यूज धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इच्छुकांनी संपर्क साधावा संपादक अमजद सय्यद 8390088786













