शिवछत्रपती स्क्वॉश अकॅडमी कळंबचा महाराष्ट्रात डंका महाराष्ट्र राज्य स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये घवघवीत यश
महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी, उंद्रि(पुणे) येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य स्क्वॉश अजिंक्य स्पर्धा 25 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेमध्ये शिवछत्रपती स्क्वॉश अकॅडमी कळंबच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले .
१) सत्यजितराजे चेतन कात्रे याने नऊ वर्ष गटात रौप्य पदक मिळविले .
2) विराज शिवाजी शिंदे याने अकरा वर्षे वयोगटात कांस्यपदक मिळविले .
3) वेदांत राजाभाऊ शिंदे याने अकरा वर्ष गटामध्ये रौप्यपदक मिळविले .
4) प्रांजल नामदेव पवार हिने अकरा वर्षे वयोगटात कांस्यपदक मिळविले .
5) वसुंधरा मुकुंद नांगरे हिने सतरा वर्षे वयोगटात सुवर्णपदक जिंकले उल्लेखनीय बाब म्हणजे ती पंधरा वर्षे वयोगटातील असतानाही वरच्या गटात खेळून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक
6) विनय राजाभाऊ शिंदे याने पंधरा वर्षे वयोगटात कांस्यपदक मिळविले
वरील सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू कोच अभिनव सिन्हा, रवींद्र नवले , सचिन शिंदे ,करण गायकवाड , राजाभाऊ शिंदे ,मुकुंद नांगरे, महादेव बोंदर सर , प्रशांत घुटे सर , अनिल शिंदे ,शरद गव्हार , यांचे मार्गदर्शन लाभले .
विजय खेळाडूंचे अभिनंदन शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमान बाळकृष्ण तांबारे सर , मोहिते तात्या , संजयजी घुले सर , जिल्हा क्रीडा अधिकारी हरनाळे सर,क्रीडा अधिकारी लटके सर , क्रीडा अधिकारी नाईकवाडी सर ,क्रीडा अधिकारी बिराजदार सर , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट तानाजी चौधरी , जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव महेश राजे निंबाळकर , सहसचिव कुलदीप सावंत, चेतन कात्रे , बालाजी पवार यांनी अभिनंदन केले .
कळंब सारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचा ठसा उमटविला .तसं पाहिला तर हा खेळ मोठ्या शहरात चालणारा तरीपण आपल्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविलेले आहे.












