• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्याच्या प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा

lokmadat news by lokmadat news
September 15, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
4
VIEWS

तुळजापूर, दि. १५ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर येथील प्राचीन मंदिर हे देशभरात प्रसिद्ध असून, येथे दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात लाखो भाविकांची गर्दी उसळते. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देण्यात आल्याबाबतची आख्यायिका देखील या मंदिराशी जोडलेली असल्यामुळे या महोत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नवरात्र महोत्सवाच्या दहा दिवसांत तुळजापूर शहर धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक रंगांनी नटते. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि देशभरातून सुमारे ५० लाख भाविक या कालावधीत दर्शनासाठी हजेरी लावतात. गोंधळी गीत, भजन, नृत्य, शास्त्रीय व लोकसंगीत यांसारखे कार्यक्रम महोत्सवाचा केंद्रबिंदू असतात. राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील ख्यातनाम कलाकारांबरोबरच स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन देण्यात येते.

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरच्या आसपास अनेक पर्यटनस्थळे असून, नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबा काका मंदिर, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर, येडशी येथील रामलिंग अभयारण्य आणि परांडा भुईकोट किल्ला हे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. येरमाळा येथील येडेश्वरी देवीला तुळजाभवानीची धाकटी बहीण मानले जाते, त्यामुळे भाविक दोन्ही देवतांचे दर्शन घेतात.

पर्यटन विभागाने राज्यातील पर्यटन स्थळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी देण्याचा संकल्प केला आहे. याच अनुषंगाने सन २०२५-२६ या वित्तीय वर्षातील महोत्सव दिनदर्शिकेत “श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सव” याला राज्याचा प्रमुख पर्यटन महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या प्रस्तावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयोजित उपक्रम
महोत्सव काळात स्थानिक लोककला, लोकनृत्य, गोंधळी गीत, भारुड, जाखडी, गोंधळ, भजन स्पर्धा, किर्तन आदींचे आयोजन होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील सुप्रसिद्ध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर व YouTube चॅनेलवर केले जाईल.

भव्य लोकसंगीत मैफल, ३०० ड्रोनच्या साहाय्याने नवरात्र थीमवर आधारित लाईट शो, जबाबदार व शाश्वत पर्यटन या विषयावर चित्रकला स्पर्धा, व्याख्याने, मॅरेथॉन, पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह, फेअर्स तसेच फॅम टूर्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रसिद्धी व सुविधा
या महोत्सवाची मराठी व इंग्रजी भाषेत यथोचित प्रसिद्धी केली जाणार असून, प्रेस नोट्सही द्विभाषिक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांना महोत्सवात सहभागी होण्याची माहिती दिली जाईल. तसेच महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटनाचा लोगो वापरण्यात येईल.

सुप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाप्रमाणे मराठी व इंग्रजी भाषेत व्यापक प्रसिद्धी केल्यास देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन तुळजापूरच्या नवरात्र महोत्सवाची प्रसिध्दीही त्याच पद्धतीने केली जाणार आहे.

या निर्णयामुळे तुळजापूरचा शारदीय नवरात्र महोत्सव केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळाच नव्हे, तर राज्याच्या पर्यटन वृद्धीचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे.

लोक मदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabad लोहाराआई तुळजाभवानीउस्मानाबादकुलस्वामिनीकोजागिरी पौर्णिमातुळजापूरतुळजाभवानीदसराधाराशिवनवरात्रोत्सव 2025पुजारी मंडळमहोत्सवशिलंगणश्रीक्षेत्र
SendShareTweet
Previous Post

राहुल काकडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव उत्तर जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

पालकमंत्री प्रताप सरनाईक १६ व १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT