• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

lokmadat news by lokmadat news
March 5, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
10
VIEWS

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

एस एम ग्रुपच्या अध्यक्षपदी निखिल मंजुळे तर उपाध्यक्षपदी सुमित साबळे यांची निवड …शंकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सवाला मिळते सामाजिक ऐक्याची दिशा


धाराशिव | लोकमदत न्यूज

एस एम ग्रुप आयोजित विश्वभूषण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न झाली. मार्गदर्शक शंकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या बैठकीत अध्यक्षपदी निखिल मंजुळे, उपाध्यक्षपदी सुमित साबळे तर सचिवपदी खंडू आपुणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीस रोहित जाधव, समीर अरब, गौतम बनसोडे सर, कृष्णा भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
एस एम ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजू महिलांना साडी वाटप, अन्नधान्य वितरण अशा अनेक उपक्रमांचा समावेश असतो. त्याच अनुषंगाने यावर्षी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रुपचे संस्थापक मार्गदर्शक शंकर माने यांनी बैठकीत दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंतीदिनी भव्य अन्नदान कार्यक्रम आयोजित केला जाणार असून इंदिरानगर येथून जयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात व शांततेत काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच जयंती मिरवणुकीच्या आयोजनासाठी एस एम ग्रुपची कार्यकारिणीही निवडण्यात आली.
एस एम ग्रुपची जयंती “सर्व धर्म समभाव” या घोषवाक्याखाली साजरी केली जाते. विशेष म्हणजे दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध जाती-धर्मातील युवकांना अध्यक्षपदाची संधी दिली जाते. त्यामुळे सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे धाराशिवमधील हे एकमेव मंडळ म्हणून एस एम ग्रुपकडे पाहिले जाते. यंदाही त्याच परंपरेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

Next Post

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

Related Posts

सामाजिक

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026
सामाजिक

धाराशिव येथील अवघ्या ७ वर्षीय मुन्नजा अल्ताफ शेख हिने पहिला रोजा पूर्ण केला.कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण

March 1, 2026
सामाजिक

धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम

March 1, 2026
सामाजिक

डोकेवाडी गावातील  सुशिक्षित तरुणांनी गावकऱ्यांकडून लोकसहभागातून उभारलं भव्य खुले सभामंडप !

February 27, 2026
सामाजिक

युवानेते रोहित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न  ५९ युवकांनि केले रक्तदान

February 27, 2026
सामाजिक

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026
Next Post

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

March 5, 2026

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

March 5, 2026

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT