• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

लवकरच शहरवासियांना उजनी सोबत तेरणा धरणाचे पाणी मिळणार – सभापती लोंढे

lokmadat news by lokmadat news
March 14, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
307
VIEWS

लवकरच शहरवासियांना उजनी सोबत तेरणा धरणाचे पाणी मिळणार – सभापती लोंढे

रेल्वे लाईनच्या कामामुळे फुटलेल्या पाइपलाईनच्या तात्काळ दुरुस्ती

धाराशिव – लोकमदत न्यूज

धाराशिव शहराला उजनी धरणाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र दूरवरून येणारे पाणी त्यातच वारंवार विद्युत प्रवाहाचा खंड आणि वारे बावधन यामुळे पाणी उचलण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी त्याचा थेट परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे आ राणाजगजितसिंह पाटील, मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तेरणा धरणातून पाईपलाईन आणण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. तीच पाईपलाईन उपळा शिवारातील धरण परिसरात फुटल्याने त्याची पाहणी करून दुरुस्ती करून घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईचे संकट लवकरच दूर होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे यांनी दिली.
लोंढे यांनी नगर परिषदेच्या सभागृहात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस माजी नगरसेवक बापू पवार, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, सहाय्यक पाणीपुरवठा अभियंता रोहित मुंडे, पाणीपुरवठा अधिकारी विकास माने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते, या बैठकीमध्ये सभापती लोंढे यांनी उजनी धरणातून आवश्यक पाणी का येत नाही ? याची माहिती पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर यांच्याकडून जाणून घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उजनी धरणातून थेट धाराशिवला पाणी उचलले जात नसून ते तीन पंपग्रहांमध्ये सोडले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्युत पुरवठा होत आहे. तेथील लोड शेडिंग किंवा विद्युत पुरवठा करण्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास मोठा विलंब लागत असल्याचे सांगितले. त्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी तेरणा धरणातून पाणी उचलण्यासाठी पाईपलाईनचे काम रात्रंदिवस युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असतानाच उपळा शिवारातील तलावानजीक रेल्वे मार्गामुळे पाईपलाईन फुटली. त्यामुळे सभापती लोंढे यांनी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणास भेट दिली. तसेच ती पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून घेतली असून या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि टेस्टिंग केल्यानंतर तेरणा धरणातून पाणी दररोज वेळेवर उचलण्यास कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे शहरवासियांना देखील सुरळीतपणे पाणी पुरवठा होणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. तसेच नागरिकांना पाणी वेळेवर पुरवठा करण्यासाठी नगर परिषदेचे प्रयत्न सुरू असून कुठल्याही प्रकारची पाणी टंचाई निर्माण होणार नसल्याचे लोंढे यांनी सांगितले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

ऑपरेशन मुस्कान-14 मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी एएचटीयूच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आयजी वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते सत्कार

Next Post

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या होमपीच असलेल्या धाराशिवमध्येच दारुड्या चालक, वाहक यांची तपासणी करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ?

Related Posts

सामाजिक

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026
सामाजिक

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026
सामाजिक

नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी ७ कोटींचा निधी मंजूर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

March 28, 2026
सामाजिक

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे) वेल्फेअर सोसायटीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा तारीख जाहीर

March 27, 2026
सामाजिक

स्मृती बुद्ध विहार व बहुजन विद्यार्थी व सामाजिक संघटनांकडून कामठा गावाचा तरुण शंभू रोकडे यांची पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

March 26, 2026
सामाजिक

धाराशिव येथे राज्यस्तरीय गंगाधर करंडक नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळावा

March 19, 2026
Next Post

परिवहन मंत्री सरनाईक यांच्या होमपीच असलेल्या धाराशिवमध्येच दारुड्या चालक, वाहक यांची तपासणी करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अंबेजवळगेच्या मेहर पठाण यांची पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस दलात निवड आ. कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार

March 30, 2026

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

March 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT