कळंब – मुंबई येथील बॉम्बे जिमखानात आयोजित 48 वी महाराष्ट्र स्टेट ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्याच्या कळंब शहरातील सत्यजीतराजे चेतन कात्रे याने 9 वर्ष वयोगटात महाराष्ट्रात 4 था क्रमांक मिळवत जिल्ह्याचा मान वाढविला आहे. विशेष म्हणजे सत्यजीतराजे हा व्हॉईस ऑफ मीडिया शिक्षण विभाग चे राज्याध्यक्ष चेतन कात्रे सर यांचा मुलगा आहे.
या स्पर्धेत इतर खेळाडूंनीही उत्तम कामगिरी केली. वेदांत शिंदेने 11 वर्ष वयोगटात महाराष्ट्रात 5 वा क्रमांक पटकावला, विवेक शिंदेने 15 वर्ष वयोगटात 6 वा क्रमांक मिळविला तर वसुंधरा नांगरे हिने 17 वर्ष वयोगटात विजेतेपद मिळवून चमकदार यश संपादन केले.
या यशामागे मार्गदर्शक राजाभाऊ शिंदे, अभिनव सर, रवी नवले सर आणि करण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या सर्व खेळाडूंसह मार्गदर्शकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.












