धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामावर स्थगिती.! नागरिकांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर विश्वास ठेवावा– राहुल काकडे
धाराशिव – शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला तब्बल १४० कोटी रुपयांचा रस्त्यांचा निधी हा महायुती सरकारच्या काळात मंजूर झाला होता. या निधीच्या मंजुरीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर, नळदुर्ग, धाराशिव आणि कळंब या भागांसाठी सातत्याने पाठपुरावा करून मोठा निधी आणला होता.
अलीकडेच या निधीअंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी कार्यारंभ आदेश (Work Order) निर्गमित झाल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या घोषणेमुळे शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांना कंटाळलेल्या नागरिकांमध्ये आशेचा किरण व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कामावर SIT चौकशीची मागणी केली. त्यानंतर दोन दिवसांतच या कामाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याची बातमी समोर आली.
या घडामोडींवर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल हरिभाऊ काकडे यांनी नागरिकांना उद्देशून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की,
“धाराशिव शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी हा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे. काहींना शहरातील विकासाची कामे पचत नसल्याने राजकीय मत्सरातून अडथळे आणले जात आहेत. मात्र आम्हाला आ. पाटील यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या सर्व अडचणींवर मात करून शहरातील रस्त्यांचे काम नक्की सुरू करतील.”
काकडे यांनी नागरिकांना आवाहन करत शेवटी म्हटले राणादादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!
शहरातील नागरिकांमध्ये आता पुन्हा एकदा या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून धाराशिवच्या रस्त्यांवरील खड्डे बुजण्याच्या दिवसांची वाट नागरिक आतुरतेने पाहत आहेत.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












