धाराशिवमध्ये “शाहरुख”सारख्या “लाल” गुटखा माफियांचा गोड खेळ! — पोलिसांना किरकोळ विक्रेतेच दिसतात, मुख्य डीलर मात्र गायब!
धाराशिव दि.०७(प्रतिनिधी) :राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असली तरी, या बंदीला अक्षरशः चुकवणारे काही गुटखा माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. जिल्ह्यात लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी गुटखा माफियांबरोबरच अवैध धंदेवाल्यावर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर काही काळ गुटखा विक्री आटोक्यात आली होती. मात्र आता पुन्हा नळदुर्ग परिसरातील अनदुर मार्गे “शाहरुख”सारख्या “लाल” दिसणाऱ्या’ गोड जोडीने धाराशिव शहरात अक्षरशा खुलेआम थैमान माजवले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही “शाहरुख” सारख्या दिसणारी “लाल” जोडी दररोज सायंकाळी चार ते सात वाजण्याच्या दरम्यान मोठ्या वाहनातून लाखों रुपयांचा गुटखा किरकोळ / होलसेल व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवते. विशेष म्हणजे, हे सर्व ऑपरेशन इतक्या गुप्तपणे केले जाते की, पानटपरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना या मुख्य होलसेल डीलर पर्यंत अजूनही पोहोचता आलेले नाही.
या मागे काही “बेळ”गाम झालेल्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ‘बेळ’गाम झालेला कर्मचारी आणि त्याचे सोबत हाताशी धरलेले काही जण वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून या गुटखा माफियांना मोकळी वाट करून देत आहेत, असा आरोप नागरिक करीत केला आहे. त्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अशा ‘बेळ’ गाम झालेल्या कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करून गुटखा माफियांच्या मुसक्या आवळतील का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव शहरात नळदुर्ग परिसरातील “अणदूर” मार्गे गुप्तपणे सुरू असलेल्या या गुटखा रॅकेटमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “पानटपरीवाल्यांवर धाडी, पण मोठे मासे मात्र पोलीसांच्या जाळ्यात का अडकत नाहीत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
भाग एक
आणखी सविस्तर बातमी भाग दोन लवकरच
लोकमदत न्यूज सत्यशोधन लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












