धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्हा पोलीस अंमलदार सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिवची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 ते 2.00 या वेळेत संस्थेच्या कार्यालयासमोर, पोलीस लाईन धाराशिव येथे उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंद पवार होते. यावेळी प्रमुख पाहुणे फुलचंद जगदाळे, संस्थेचे मार्गदर्शक विशाल राजेश्वरकर व व्हाइस चेअरमन श्रीमती गितांजली फुलसुंदर (राऊत) उपस्थित होते.
सभेला संचालक किरण डोके, शिवाजी गवळी, पंडीत मुंडे, योगेश हनुमंत सूर्यवंशी, अजिनाथ तरंगे, मकसूद काझी, तज्ञ संचालक अतुल जाधव, कार्यलक्ष संचालक सचिन शिंदे, संचालिका श्रीमती भाग्यश्री देशमुख (जाधव) यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद हजर होते. सभासद चांद शेख, नानासाहेब भोसले, आगतराव कठारे, अविनाश शिंदे, गोकुळ पवार, गुरू माळी, अमर तांबे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
या सभेत दीर्घ मुदत कर्ज मर्यादा 6 लाखावरून 8 लाख करण्यात आली, तर तातडी कर्ज मर्यादा 40 हजारांवरून 50 हजार रुपये करण्यात आली. सन 2024-25 साठी सभासदांना 7 टक्के लाभांश दिवाळीपूर्वी वाटप करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच सभासदांचा विमा काढण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत कायम ठेवण्यात आला. सन 2024-25 चा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व तेरिज पत्रक मंजूर करण्यात आले. सन 2024-25 च्या लेखापरीक्षण अहवालातील दोष दुरुस्तीस मान्यता देण्यात आली. सन 2025-26 सालाचे अंदाजपत्रकास मान्यता देऊन 2024-25 च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चासही मंजुरी देण्यात आली.
सभेचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव महेशकुमार हरीभाऊ कचरे यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन चेअरमन गोविंद भारत पवार यांनी केले. संस्थेची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत व उत्साहात पार पडली.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद 8390088786














