• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विकास व्हावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

lokmadat news by lokmadat news
October 15, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
16
VIEWS

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विकास व्हावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक

जिल्हा नियोजन समिती सभा

धाराशिव दि १५ ऑक्टोबर (प्रतिनिधी) जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या काळात जिल्हा प्रशासन व यंत्रणांनी मेहनत करून चांगले काम केले आहे.त्यामुळे शेवटच्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचता आले.जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्त्वाची आहे.या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाचा विकास व्हावा हाच आपला प्रयत्न आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

आज जिल्हा नियोजन समितीची सभा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली,यावेळी अध्यक्षस्थानावरून .सरनाईक बोलत होते.सभेला आमदार सर्वश्री राणाजगजितसिंह पाटील,विक्रम काळे,कैलास घाडगे पाटील,प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,सहाय्यक जिल्हाधिकारी रैवैयाह डोंगरे व जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरनाईक म्हणाले की,जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता २२ कोटी रुपयांच्या कामांना शासनाने मान्यता दिली आहे.१८० कोटी रुपयांच्या कामांना शासनाने निकष लावून कामे करण्याचे निर्देश दिले आहे.या निधीचा वापर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करण्यात येईल.ज्या ठिकाणी कामाची आवश्यकता आहे,तेथेच कामे करण्यात येतील.लोकांची कामे झाली की त्यांना दिलासा मिळतो, असे ते म्हणाले.

आमदार काळे म्हणाले की,पुरामुळे अनेक ठिकाणी असलेल्या डीपी वाहून गेल्या. मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड निर्माण झाले.अनेक ठिकाणी आजही वीज पुरवठा खंडित आहे,त्यामुळे वीज वितरण कंपनीने खंडित फिरत रोड करण्याचे काम हाती घ्यावे.जिल्ह्यात आवश्यक असलेल्या डीपीची मागणी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयाकडे करावी,असे त्यांनी सांगितले.



आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील कामाचा आढावा घेण्यात आला.दि.०१.०५.२०२५ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ करीता एकूण मंजूर नियतव्यय रूपये ४५७ कोटी असून,शासनाकडून मंजूर निधीच्या ३० टक्के प्रमाणे आज अखेर रूपये १३७.०९ कोटी एवढा निधी प्राप्त झाला आहे.यंत्रणेकडील प्राप्त प्रस्तावानुसार आज रोजी एकूण रूपये १०३.९५ कोटी किंमतीच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. तसेच रूपये २२.९६ कोटी निधी वितरीत करण्यात आला असून प्रत्यक्षात रूपये १५.४१ कोटी एवढा निधी खर्च झालेला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन २०२५-२६ करीता एकूण मंजूर नियतव्यय रूपये ७५ कोटी असून,शासनाकडून मंजूर निधीच्या ३० टक्के प्रमाणे आज अखेर रूपये २२.५० कोटी एवढा निधी प्राप्त झाला आहे. यंत्रणेकडील प्राप्त प्रस्तावानुसार आजरोजी एकूण रूपये ९.३९ कोटी किमतीच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.तसेच रूपये ८.९१ कोटी निधी वितरीत करण्यात आला असून वितरीत केलेनुसार संपूर्ण निधी रूपये ८.९१ कोटी एवढा खर्च झालेला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी उपयोजना (OTSP)) सन २०२५-२६ करीता एकूण मंजूर नियतव्यय रूपये २.५२ कोटी असून, शासनाकडून मंजूर निधीच्या ३० टक्के प्रमाणे आजअखेर रूपये ७५.०० लक्ष एवढा निधी प्राप्त झाला आहे.
यंत्रणेकडील प्राप्त प्रस्तावानुसार आज रोजी एकूण रूपये ३७.०० लक्ष किंमतीच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.तसेच रूपये ११.१२ लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून खर्च निरंक आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ पासून शासकीय विकास कामांना/योजनांना एप्रिल ते जून या कालावधीत व स्थानिक स्वराज्य संस्थांकडील कामांच्या याद्यांना एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करणेबाबत शासनाकडून १ ऑगस्ट,२०२५ अन्वये सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
नियोजन विभागाचे ७ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या पत्रान्वये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ अंतर्गत विकास कामांना/योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याकरीता माहे.ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यानुषंगाने माहे ऑक्टोबर,२०२५ पर्यंत चालू आर्थिक वर्षातील विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्री.गोडसे यांनी यावेळी दिली.या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

एम आर आय मशीन सुरु करण्यास परवानगीच मिळेना !तज्ञांच्या टीमचा तपासणी करण्यास टाळाटाळ का ?रुग्णांची परवड अन् नेतेगिरी श्रेयवादात गुरफटली !

Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भव्य धम्म रॅली…युद्ध नको ,बुध्द हवा , घोषणांनी शहर दुमदुमले

Related Posts

महाराष्ट्र

आ.कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धाराशिव हॉलीबॉल महासंग्राम’ २६ संघांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रेक्षकांची भरगच्च गर्दी

March 1, 2026
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा…वेतनवाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

February 25, 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून बारामती–धाराशिव नव्या एसटी बससेवेचा शुभारंभ

February 24, 2026
महाराष्ट्र

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

February 23, 2026
महाराष्ट्र

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित 

February 19, 2026
महाराष्ट्र

यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

February 19, 2026
Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भव्य धम्म रॅली...युद्ध नको ,बुध्द हवा , घोषणांनी शहर दुमदुमले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

March 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT