धाराशिव बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा शौचालयाला लागूनच ते ही तात्पुरत्या स्वरुपाची !
महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे !
आगार प्रमुखाच्या हलगर्जीपणामुळे अकाऊंट विभाग स्थलांतरित करण्याची प्रक्रिया रखडली ?
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) – जनतेची वाहिनी म्हणून लाल परी अर्थात एसटी बसकडे बघितले जाते. या एसटीचे मुख्यालय म्हणजेच जिल्ह्याचे बस स्थानक नवेकोरे दिसत असली तरी यामध्ये सर्व सुविधा देण्यास प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या सुविधेमध्ये मूलभूत गरज असलेले पिण्याचे पाणी असून बस स्थानक सुरू झाल्यापासून आजपर्यंत प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. मात्र, राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा पाहणी दौरा आज शनिवार दि.२९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता होणार आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी खडबडून जागे होत तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे “नाटक” केले असून पाणी फिल्टर आणून ठेवले आहे. फिल्टर ठेवले असले तरी ते देखील चक्क शौचालयासमोरच असल्यामुळे दुर्गंधी पाणी कोण पिणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिथे ठेवले आहे ते आडबाजूला आहे प्रवाशी जेव्हा शौचालयाकडे जाईल तेव्हाच ते दिसू शकते. मात्र त्या ठिकाणी चालता ही येत नाही तिथे वास येतो मग तिथे प्रवासी पाणी कसे पिऊ शकेल हा प्रश्न अनुत्तरीतच आहे, पालकमंत्र्याच्या समोर तोंड देखलेपणा व दिखावा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. आरोग्याशी खेळणाऱ्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्या विरोधात प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्री सरनाईक संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.
धाराशिव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानक आहे. त्या बस स्थानकावर प्रवाशांना आवश्यक असलेल्या कुठल्याही सोयीसुविधा अद्यापपर्यंत उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. प्रवाशांना अत्यावश्यक असलेल्या मूलभूत गरजांची पूर्तता देखील केलेली नाही. शौचालय बांधले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणात आहे. या ठिकाणी लघुशंका किंवा शौचालय जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड कुचंबाना होत आहे. शौचालयामधील स्वच्छता करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. परंतू, शौचालयाची अस्वच्छता कशामुळे ठेवली जात आहे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिण्याचे पाणी हे लहानापासून अबालवृद्ध यांच्यापर्यंतच्या सर्व प्रवाशांना लागत असून ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बस स्थानक (आगार) प्रमुखांची आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी काल अचानक सोलापूर येथील स्थानकास अचानक भेट दिली असता त्या ठिकाणी असलेली परिस्थिती पाहता तत्काळ आगारप्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर ते आज धाराशिव येथे येणार असल्याचे समजताच एरवी अत्यंत अस्वच्छता असलेले स्थानक रात्री अचानक उशिरापर्यंत स्वच्छता साफसफाईचे काम सुरू होते, याची दखल घेऊन पालकमंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
धाराशिव बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा शौचालयाला लागूनच तात्पुरत्या स्वरुपाची !
महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे !
डेपो मॅनेजरच्या हलगर्जीपणामुळे ए.एस.ओ. विभाग स्थलांतरित करण्याची प्रक्रिया रखडली ?
धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) – जनतेची वाहिनी म्हणून लाल परी अर्थात एसटी बसकडे बघितले जाते. या एसटीचे मुख्यालय म्हणजेच जिल्ह्याचे बस स्थानक नवेकोरे दिसत असली तरी यामध्ये सर्व सुविधा देण्यास प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या सुविधेमध्ये मूलभूत गरज असलेले पिण्याचे पाणी असून बस स्थानक सुरू झाल्यापासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. मात्र, राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा पाहणी दौरा उद्या शनिवार वार उद्या दि.२९ नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नाटक केले असून पाण्याने भरलेल पाणी फिल्टर आणून ठेवले आहे. फिल्टर ठेवले असले तरी ते देखील चक्क शौचालयासमोरच असल्यामुळे दुर्गंधी पाणी कोण पिणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्र्याच्या समोर तोंड देखलेपणा व दिखावा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. आरोग्याशी खेळणाऱ्या एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्या विरोधात प्रवाशांमध्ये तीव्र संता व्यक्त होत आहे. त्यामुळे मंत्री सरनाईक संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न विचारत आहेत.
धाराशिव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बस स्थानक आहे. त्या बस स्थानकावर प्रवाशांना आवश्यक असलेल्या कुठल्याही सोयीसुविधा अद्यापपर्यंत उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. प्रवाशांना अत्यावश्यक असलेल्या मूलभूत गरजांची पूर्तता देखील केलेली नाही. शौचालय बांधले असून त्यामध्ये पाण्याचा ठणठणात आहे. त्यामुळे संपूर्ण बस स्थानकामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. या ठिकाणी लघुशंका किंवा शौचालय जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड कुचंबाना होत आहे. शौचालयामधील स्वच्छता करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. परंतू, शौचालयाची अस्वच्छता कशामुळे ठेवली जात आहे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिण्याचे पाणी हे लहानापासून अबालवृद्ध यांच्यापर्यंतच्या सर्व प्रवाशांना लागत असून ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बस स्थानक प्रमुखांची आहे.
सहा महिन्यांपासून महिला विश्रांती कक्षच नाही !
एस.टी. महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना नवीन इमारतीतील पहिल्या माळ्यावर विश्रांती कक्ष बांधलेले आहे. मात्र ते अद्यापपर्यंत त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बाहेर गावावरुन ड्युटी करुन आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आराम कुठे आणि कसा करायचा ? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विश्रांती कक्षा अभावी महिला कर्मचाऱ्यांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्यामुळे मंत्री सरनाईक यांनी महिलांच्या हक्काचे म्हणजेच लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी ते कक्ष तात्काळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
महिला विश्रांती कक्षातच अकाऊंट विभाग स्थलांतरित करण्याचा घाट ?
एस टी महामंडळाचा अत्यंत महत्त्वाचा नव्हे तर आत्मा असलेला रोखे विभाग म्हणजेच अकाउंट विभाग हा स्थानक शेजारील जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये आहे. ते अत्यंत अडगळीला असून त्या ठिकाणी साप यासारखे घातक प्राणी वारंवार निघत आहेत. शिवाय एसटी बस कंडक्टर (वाहक) यांना रात्री अपरात्री जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. तसेच या ठिकाणी बेवड्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात सातत्याने असते तर त्याच ठिकाणी बिनधास्तपणे लघुशंका करत आहेत. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. रात्री ड्युटी उशिरा संपल्यावर तेथे जाण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कारण त्या ठिकाणी कसलेही सुरक्षा रक्षक नाहीत, त्यामुळे त्या इमारतीमधील अकाऊंट विभाग महिला कक्षातच पार्टिशन उभारून स्थलांतरित करण्याचा घाट घातला असून तसे आदेश मागील दोन महिन्यापूर्वीच दिलेले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी आजपपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली नाही. महिला विश्रांती कक्षात हा विभाग सुरू केला तर त्यांनी विश्रांती करायची कशी ? कारण कारण केवळ पार्टीशन मारल्याने काय होणार? त्याठिकाणी पुरुष कर्मचारी देखील येणार आहेत. त्यामुळे बाहेरच्या एसटी महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्यांनी ड्युटी करुन आल्यानंतर आराम करायचा कुठे आणि कसा ? त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्षा अभावी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत असून त्यांची प्रचंड कुचंबणा होत आहे. त्यांची समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाची असून खुद्द मंत्री सरनाईक यांनी जातीने लक्ष घालून तो प्रश्न सोडवून लाडक्या बहिणींना न्याय द्यावा, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांतून होऊ लागली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786














