• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

उठा उठा निवडणूक आली… कार्यकर्त्यांना वेड्यात करण्याची वेळ झाली! निष्ठावंतांची फसगत  आमिषावर राजकारण रंगले

lokmadat news by lokmadat news
November 20, 2025
in राजकारण
0
0
SHARES
604
VIEWS

उठा उठा निवडणूक आली… कार्यकर्त्यांना वेड्यात करण्याची वेळ झाली!
धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये निष्ठावंतांची फसगत  आमिषावर राजकारण रंगले!
धाराशिव दि.२०(अमजद सय्यद): धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताच शहरातील अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मैदान गाठले. वर्षानुवर्षे मतदारसंघातील आरोग्य, पाणी, लाईट, स्वच्छता अशा नागरी समस्यांवर काम करत आपले राजकीय अस्तित्व निर्माण करणाऱ्या आणि पक्षासाठी जीवाचे रान करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना यंदा उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र, उमेदवारी जाहीर होताच काही कार्यकर्त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. पक्षाच्या हितासाठी, बूथ प्लससाठी, जनतेच्या समस्यांसाठी रात्रंदिवस झगडणाऱ्या निष्ठावंतांना दुर्लक्षित करून काही ठिकाणी केवळ नेत्यांना खुश ठेवणाऱ्या व जवळच फिरणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली असल्याचे दिसून येत आहे.
पक्ष नेतृत्वाकडून ‘काम करणारे कार्यकर्ते’ नव्हे तर ‘स्तुती करणारे चेले’ अधिक महत्त्वाचे मानले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून समाजसेवा करत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना न जुमानता, फक्त नेत्यांच्या जवळीकतेवर आधारित तिकीटवाटप झाल्याने कार्यकर्त्यांची फसगत झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले हे कार्यकर्ते आता पक्षाकडून मिळणाऱ्या विविध आमिषांचे लक्ष्य होऊ लागले आहेत. त्यांना पुन्हा खुश करण्यासाठी पक्ष नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवक, पक्षपदे, विकास कामांतील सहभाग यासारख्या आश्वासनांचा पाऊस सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.
धाराशिव नगरपरिषद ही अ दर्जा असलेली नगर परिषद एकूण 41 सदस्यांची असून यामध्ये  केवळ 3 ते 4 जागाच स्वीकृत (क्रॉप नगरसेवक) नगरसेवकांसाठी असतात. तरीदेखील काही पक्षातील नेत्यांनी २० ते २५ कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य करण्याचे आश्वासन दिले असल्याची चर्चा शहरात ऐकू येत आहे. निवडणुकीची धावपळ सुरू असताना अशा आश्वासनांची जंत्री दाखवून नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या इच्छुकांकडेही आता माघारीसाठी हाच ‘स्वीकृत सदस्य’चा लॉलीपॉप दाखवला जात असल्याचे म्हटले जात आहे. उद्या माघारीचा शेवटचा दिवस असल्याने हे राजकारण आणखी रंग घेण्याची शक्यता आहे.
राजकीय कार्यकर्ते वर्षानुवर्षे समाजासाठी, पक्षासाठी, जनतेसाठी कंबर कसून काम करतात. पण निवडणुकीत त्यांचे योगदान विसरले जाते आणि निवडणूक जवळ आली की “उठा उठा निवडणूक आली, कार्यकर्त्यांना वेड्यात करण्याची वेळ झाली” अशा शैलीत त्यांना फक्त आश्वासनांचे आमिष दाखवले जाते. या लॉलीपॉप राजकारणाला यावेळी किती कार्यकर्ते बळी पडतात आणि किती जण आपली नाराजी कायम ठेवतात, किती कार्यकर्ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे खासदार सुप्रिया सुळे यांना खरमरीत पत्र

Next Post

शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’…माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर व जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

राजकारण

फक्त ड्रोन सर्वेक्षणाने कचरा डेपोचा प्रश्न सुटणार का? ‘रिल्स’पेक्षा प्रत्यक्ष काम करा नागरिकांचा संताप!

March 4, 2026
राजकारण

शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात ‘निर्भय’ व ‘पिंक’ पथकाची गस्त वाढणार

March 3, 2026
राजकारण

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

March 3, 2026
राजकारण

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

March 3, 2026
राजकारण

जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण पाचव्या दिवशी स्थगित

March 1, 2026
राजकारण

‘सांजा रोड’ की मृत्यूचा सापळा? दीड किमी प्रवासाला पाऊण तास लोकप्रतिनिधी मौनात, ठेकेदार बेफिकीर, प्रशासन निष्क्रिय आणि नागरिक झोपेत.!

March 5, 2026
Next Post

शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’...माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर व जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहर पोलिसांची ऑनलाईन जुगारावर धडक कारवाई ₹45,200 च्या साहित्यासह मुख्य म्होरके पोलिसांच्या ताब्यात

March 5, 2026

‘सर्व धर्म समभाव’चा संदेश देत एस एम ग्रुप साजरी करणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

March 5, 2026

लोकमदत न्यूजचा दणका! सांजा रोडवरील दुर्दशेची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन-ठेकेदार हलले धुळीवर पाणी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी सुरू!

March 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT