धाराशिव नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी… तर उपनगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये उभी फळी तयार.? सत्ताधारी पक्षासाठी लॉबीची लागन धोकादायक.!
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – नुकताच नगर परिषद निवडणुकीचा धुरळा उडलेला सर्वांनी पाहिला आहे. या निवडणुकीत धाराशिव नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्यामुळे नगराध्यक्षपदावर भाजपच्या नेहा काकडे विराजमान झाले आहेत. आता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाच भाजपमधील एका नगरसेवकाने २२ पैकी १० ते १५ नगरसेवकांची लॉबी आपल्या बाजूने वळवून पक्ष नेतृत्वावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी गटबाजी उफाळून येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून लॉबीला ऊत येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या तसेच काही जणाला आश्वासित केलेल्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढल्या आहे. विशेष म्हणजे भाजप हा शिस्तीचा पक्ष मानला जात असला तरी धाराशिवमध्ये नियम व शिस्त धाब्यावर बसविली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणी काही जरी आटापिटा केला तरी “तो” नेताच उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. ही निवड प्रक्रिया दि.१६ जानेवारी रोजी पार पडणार आहे.
धाराशिव नगर परिषदेचे ४१ नगरसेवक आहेत. यामध्ये भाजपा २२, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टी – ८, शिवसेना (ठाकरे) – ७, काँग्रेस पार्टी – ३, व एएमआयएम – १ असे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष नेहा काकडे या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून कारभार सुरू केला आहे. आता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया बाकी आहे. यासाठी आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या कडे ५ – ६ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष पदासाठी लॉबिंग केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी त्यांनी फिल्डिंग देखील लावलेली आहे. मात्र, ही तयारी सुरु असतानाच एका नगरसेवकाने मलाच उपनगराध्यक्ष व्हायचे असल्याचा अटहास धरलेला आहे. त्यासाठी त्यांनी २२ पैकी १० ते १५ नगरसेवकांची लॉबी आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरणार असून त्यांची इच्छा केव्हा, कशी व कोण पूर्ण करणार हे सांगणे कठीणच होऊन बसले आहे. कारण ही लॉबी अशीच सुरू राहिली तर भविष्यात कोण आणि कोणाबरोबर हात मिळवणी करील हे सांगता येत नसल्याचे या कृतीतून स्पष्ट इशारा मिळत आहे. मात्र, पक्षाचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार राणाजगजितसिंह पाटील हे कोणती भूमिका घेतात ? यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












