कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी देऊन जीवन अशोक जाधव यांना पक्षश्रेष्ठी न्याय देणार ! प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारीची मागणी जोरात
धाराशिव (प्रतिनिधी):मातोश्रीशी एकनिष्ठ आणि परंपरागत शिवसेना घराण्यातील कार्यकर्ते स्वर्गीय अशोक धोंडीबा जाधव यांचे चिरंजीव जीवन अशोक जाधव हे मागील अनेक वर्षांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी निष्ठा ठेवून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या या सच्च्या शिवसैनिकाच्या कुटुंबात प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी देऊन सन्मान करावा, अशी मागणी नागरिक आणि शिवसैनिकांकडून जोरदार केली जात आहे.
प्रभाग क्रमांक ११ हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, या ठिकाणी जाधव कुटुंबातील प्रतिनिधीला उमेदवारी देऊन पक्षाने एकनिष्ठतेचा सन्मान करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षश्रेष्ठी खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांनी या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
जीवन जाधव यांनी २००२ पासून नवरात्र उत्सवात तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांची सेवा, अन्नदान, वृक्षारोपण, लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, मतिमंद मुलींच्या वसतिगृहात अन्नदान व भेटवस्तू देणे, तसेच शाळांमध्ये कपाट व सिमेंट देऊन बांधकामासाठी मदत अशी विविध सामाजिक कामे केली आहेत. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या जाधव यांच्या कार्याचा गौरव श्रीकृष्ण गणेश मंडळ, गवळीवाडा धाराशिव यांनी सन्मानपत्र देऊन केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचारसरणीवर चालत जाधव यांनी कधीच स्वतःसाठी उमेदवारीची मागणी केली नाही. केवळ पक्षासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणारे म्हणून त्यांनी प्रभागात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नागरिकांच्या अडचणींना तत्परतेने हाताळणे, सामाजिक मदतीसाठी सदैव पुढाकार घेणे आणि पक्षनिष्ठ राहून कार्य करणे यामुळे प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
अशा सच्च्या, निष्ठावंत आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या कुटुंबात पक्षाने प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी देऊन सन्मान करावा, अशी मागणी नागरिक आणि शिवसैनिकांकडून केली जात आहे. पक्षश्रेष्ठींनी जीवन अशोक जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सच्च्या शिवसैनिकाचा गौरव करावा, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

















