धाराशिव नगरपरिषद प्रभाग १८ मध्ये “तात्पुरते नेते” आणि कायमस्वरूपी जनसेवक यांच्यातील खऱ्या लढतीला सुरुवात – अजहर मुजावर यांच्या सामाजिक कार्यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक…
धाराशिव दि.१२(प्रतिनिधी):धाराशिव नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील सर्व प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक वर्षे जनतेपासून दूर राहिलेल्या आणि निवडणुकीच्या काळातच समाजसेवक बनण्याचा आव आणणाऱ्या नेत्यांचा जनतेत संताप वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मध्ये परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी दिसत आहे. कारण येथे नागरिकांचा झुकाव हा कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराकडे नसून, वर्षभर २४ तास जनतेसाठी झटणाऱ्या अजहर चांद मुजावर यांच्या बाजूने असल्याचे झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
अजहर मुजावर हे सामान्य कुटुंबातील, पण समाजकार्याची ओढ असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून धाराशिव शहरात ओळखले जातात. गेली अनेक वर्षापासून ते कसलाही राजकीय स्वार्थ न ठेवता नागरिकांच्या अडीअडचणीसाठी दिवस-रात्र एक करीत काम करत आहे. प्रभाग क्रमांक १८ मधील नागरिकांच्या समस्या — मग त्या हॉस्पिटलशी संबंधित असोत, विजेच्या असोत की स्वच्छतेच्या — मुजावर हे स्वतःच्या पुढाकाराने सोडवतात. त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेला कोणताही नागरिक रिकाम्या हाताने किंवा निराश होऊन परत जात नाही, अशी त्यांची ख्याती आहे.
कोरोना काळामध्ये अजहर मुजावर यांनी जीवाची बाजी लावत कोविडग्रस्त रुग्णांना मदतीचा हात दिला. त्याकाळात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे, डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचाराची मदत करणे, अगदी मृत रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी घेणे अशा अनेक संवेदनशील कामांमध्ये त्यांनी स्वतःहून सहभाग घेतला होता. या कामांमुळेच त्यांना सामान्य नागरिकांच्या “गळ्यातला ताईत” म्हणून सन्मानाने ओळखले जाते.
याशिवाय, दरवर्षी ते महा रक्तदान शिबिरे आयोजित करून शेकडो रुग्णांना रक्त उपलब्ध करून देतात. युवकांना समाजकार्यात सहभागी करून घेत त्यांनी अनेक तरुणांना जनसेवेच्या प्रवाहात आणले आहे. या सर्व कार्यामुळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये अजहर मुजावर हे फक्त एक समाजसेवक नाहीत, तर लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
दुसरीकडे, या प्रभागात काही तथाकथित “स्वयंघोषित” नेत्यांनी निवडणुकीची घोषणा होताच अचानकच जनतेमध्ये मिसळण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. आतापर्यंत नागरिकांशी कोणताही संपर्क नसलेले, समाजकार्याचा अनुभव नसलेले हे नेते आता अचानक जनसेवक बनल्याचा आव आणत आहेत. केवळ पंधरा ते वीस दिवसांमध्ये प्रभागात येऊन काही ठिकाणी लाईट बसवणे, रस्त्यावर फिरणे, फोटो-रिल्स तयार करणे आणि सोशल मीडियावर प्रचार करणे एवढ्यापुरतेच त्यांचे समाजकार्य मर्यादित असल्याचे नागरिक सांगत आहेत.
प्रभागातील नागरिकांनी सांगितले की “नगरसेवक होण्यासाठी केवळ पंधरा दिवस पुरेसे नसतात, त्यासाठी वर्षभर जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या समजून घ्याव्या लागतात. केवळ पैशाचा वापर करून आणि दिखावा करून “नेता” होता येत नाही.”
प्रभागातील नागरिकांनी लोकमदत न्यूजशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, “आम्हाला पक्षाशी काही देणंघेणं नाही, आमच्यासाठी व्यक्ती महत्त्वाची आहे. अजहर मुजावर यांनी गेली अनेक वर्षे जनतेसाठी केलेल्या निःस्वार्थ कामाच्या बळावर आम्ही त्यांना स्वतः प्रचार करून बहुमताने विजयी करू.”
त्यांच्या कार्यामुळे निर्माण झालेला नागरिकांमधील विश्वास, प्रभागातील दांडगा लोकसंपर्क, आणि समाजासाठी असलेली तत्परता पाहता अजहर मुजावर हे या निवडणुकीत सर्वसामान्यांचा खरा उमेदवार बनले आहेत. नागरिकांचा एकमुखी प्रतिसाद “केवळ पंधरा दिवसांत लाईट लावून किंवा शिबिर घेत नगरसेवक होता येत नाही, त्यासाठी अजहर मुजावरसारखा वर्षभर झटणारा कार्यकर्ता लागतो.”
या प्रभागातील नागरिकांनि स्पष्ट सांगितले की “पक्ष नाही, व्यक्तिमत्त्व महत्त्वाचं!” समाजासाठी केलेल्या निस्वार्थ कार्याच्या बळावरच अजहर मुजावर यांना आम्ही विजयी करून दाखवू, अशी हाक जनतेकडून दिली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात धाराशिव नगर परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786














