बौद्ध चैत्य स्तूपाची भिक्खु संघाने केली वंदना
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – तालुक्यातील तेर हे
मौर्य व सातवाहन काळात बौद्ध धम्माच्या प्रसार व प्रचाराचे केंद्र होते येथील बौद्ध चैत्य स्तूप हे बौद्ध धम्माची साक्ष आहे तेर हे बौद्ध समाजाची बुध्दाची चैत्य भूमी असल्याचे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थोरो यांनी दि.३१ ऑगस्ट रोजी केले.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे दर रविवारी चलो बुद्ध विहार अभियान लातूर अंतर्गत तेर येथे भिक्खु पय्यानंद थोरो यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथील प्राचीन पावन बौद्ध चैत्य स्तूप येथे बुद्ध वंदना, चैत्य पूजा, ध्यान, परित्राण आणि धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंतेजी पय्यानंद थेरो बोलताना पुढे म्हणाले की, तेर प्राचीन काळात मोठे सुसज्ज शहर होते. सातवाहन राजा वाशिष्टी पुत्र पुलुमावी यांच्या काळातील प्रांतिक उपराजधानी दर्जा तेरला प्राप्त होते. सम्राट अशोकाने याठिकाणी बुध्दाचा अस्थी धातू चैत्य प्रतिस्थापित करून तेरला वैभव वाढविले होते उत्खननात सापडलेल्या बौद्ध चैत्य स्तूपमुळे तेर जगाच्या दृष्टीक्षेपात आले आहे. त्यामुळे परिसरातील तमाम बौद्ध बांधवांनी आपल्या परिवारासह येथील बौद्ध चैत्य स्तूपास भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन कैलास शिंदे, डॉ कमलाकर कांबळे, रमाई फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत, राजेंद्र निकाळजे आदींनी मनोगत व्यक्त केले. तर भिक्खु धम्मसार, भंते बोधीराज, आर्या मेत्ता यांचीही धम्म देशना झाली. यावेळी सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, सुहास सरवदे, सुमेध वाघमारे, आशा चिकटे, डॉ दुष्यंत कटारे, प्रो देवदत्त सावंत, सुशील चिकटे, अनिल हजारे, मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अरुण बनसोडे, अशोक बनसोडे, दिलीप वाघमारे, यू. व्ही माने सुनील बनसोडे, विजय गायकवाड, प्रभाकर बनसोडे, भाऊसाहेब धावारे, प्रो महेंद्र चंदनशिव, बाळासाहेब माने, रविंद्र कांबळे रमेश कांबळे, रमेश गायकवाड, मिलिंद धावारे, अनिरूध्द बनसोडे, करण ओहळ, उदय सोनवणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तेर, लातूर, धाराशिव येथील बौद्ध उपासकांनी परिश्रम घेतले
जीर्णोद्धाराचे काम केल्याबद्दल आ. पाटील यांचे मानले आभार
तेरचे भूमिपुत्र तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने येथील बौद्ध चैत्य स्तूपाच्या जीर्णोद्धारासाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून जीर्णोद्धाराचे काम करत असल्याबदल भिक्खू पय्यानंद थेरो यांनी त्यांचे आभार मानत आ. पाटील यांच्या हातून असेच पुण्यकर्म घडत रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.












