सर्वात युवा, धाडसी, निष्कलंक व उच्च शिक्षित कृष्णा पंडित (आबा) मुंडे मतदारांच्या गळ्यातील बनतायेत ताईत !
महाविकास आघाडीची प्रभाग ७ मध्ये धगधगती मशाल पेटवणार !
सामाजिक जान अन् भान असलेला विकासात्मक चेहरा
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – राजकारण म्हटलं की चालाख, जुनी (वयस्कर) आणि मुरब्बी मंडळी आजपर्यंत प्रत्येक मतदारांच्या नजरेसमोर उभा राहतात. मात्र, धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून तरुण, तडफदार, सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये युवा, उच्च शिक्षित, निष्कलंकीत, सामाजिक जान, भान असलेला आणि गरजवंताच्या मदतीला धावून जाणारा विकासात्मक चेहरा म्हणून परिचित असलेले युवा नेतृत्व कृष्णा पंडित (आबा) मुंडे यांच्याकडे पाहिले जात आहे. ते प्रथमच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या फडात शिवसेनेची अर्थात महाविकास आघाडीची धगधगती विजयी मशाल पेटविणार आहेत. त्याचे कारण देखील तसेच आहे, ते या प्रभागातील मतदारांच्या विशेषतः तरुणाईच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार ठरत असून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर सहज मात करण्यात यशस्वी ठरतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल घराघरात वाजू लागला आहे. शहरात विकासात्मक कामे करणारा नेता हवा असे चर्चा जोरात सुरू असून मतदार नवीन तरुण चेहऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच प्रभाग ७ मध्ये मतदारांना हवा असलेला उमेदवार मिळाला असून तो निष्कलंकित व उच्च शिक्षित असलेल्या कृष्णा पंडित (आबा) मुंडे या रूपाने मिळालेला आहे. उच्च शिक्षित, सामाजिक भान असलेला व गोरगरिबांच्या अडीअडचणीला धाऊन जाणारा नवखा उमेदवार असल्यामुळे मतदार देखील… नगरसेवक नव्हे जनसेवक…. म्हणून पसंती देत आहेत. विशेष म्हणजे या प्रभागात अशा प्रकारचा सामाजिक जान आणि भान असलेला उमेदवार लाभलेला नाही. प्रथमच मुंडे यांच्या माध्यमातून प्रभागातील इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे या प्रभागात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












