तुळजापूर रोड परिसरात मोठा पत्ता क्लब सुरू असल्याची चर्चा, नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव शहरात काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या धडक कारवाई ( विशेष मोहीमेनंतर) हद्दपार झालेले पत्त्याचे क्लब पुन्हा डोके वर काढू लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून जिल्ह्याचे सूत्र हाती घेतलेले रितू खोखर रुजू होताच त्यांनी लगेच अवैध धंदेविरोधातील मोहिमेला वेग दिला होता, त्यांच्या कार्यकाळात शहरातील अवैध धंदे जवळपास पूर्णपणे आटोक्यात आले होते. त्यानंतरच्या काळातही अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या वेगवेगळ्या पथकातील कारवाईत शहरातील चोरी-चुपके चालणारे पत्त्याचे सर्वच क्लब उद्ध्वस्त करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर–सोलापूर बायपासवरील सर्वात मोठ्या पत्त्या क्लबवर छापा टाकल्यानंतर शहरातील पत्ता व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. मात्र, पुन्हा एकदा तुळजापूर रोड परिसरात पत्त्याचे क्लब हळूहळू सुरू झाल्याची कुजबुज सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पत्त्यांचा क्लब सुरू असून अवैध धंदेविरोधातील कठोर कारवाई पुन्हा सुरू करावी, असे नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












