धाराशिव, दि. २१(प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीच्या दहा उमेदवार निवडून आले आहेत.
या निवडणुकीत आघाडीच्या खालील उमेदवारांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १ अ मधून अक्षय लक्ष्मण जोगदंड, ३ ब मधून सचिन उर्फ राजाभाऊ पवार, ५ ब मधून सोनाली अमित उंबरे, ९ ब मधून संतोष उर्फ नाना घाटगे, ८ ब मधून प्रदीप प्रभाकर मुंडे, १९ ब मधून सौ. सोनाली रविंद्र वाघमारे, १९ क मधून सौ. ज्ञानेश्वरी अजित (राज) निकम, १५ ब मधून सौ. केशरबाई ज्ञानदेव करवर, १५ अ मधून सिद्धार्थ अंगुल बनसोडे तसेच १८ अ मधून पठाण उज्मासबा अजहरखान यांनी विजय संपादन केला.
या सर्व विजयी उमेदवारांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. धाराशिवच्या विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुख कारभारासाठी हे नेतृत्व प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या यशामागे अहोरात्र मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि मतदारांचे खासदार निंबाळकर यांनी आभार मानले. संघटनेच्या ताकदीमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या निवडणुकीत जे उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनी खचून न जाता पूर्वीप्रमाणेच जनतेच्या सेवेसाठी आणि संघटनेच्या मजबुतीसाठी जोमाने काम सुरू ठेवावे, असे आवाहनही खासदारांनी केले. संघर्ष हाच विजयाचा खरा मार्ग असून पुढील लढाईत यश निश्चितच आपलेच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा ठरणार असून, येणाऱ्या काळात नवनिर्वाचित प्रतिनिधी जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतील, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)– काँग्रेस आघाडीचे “या” प्रभागातील “हे” “दहा” उमेदवार विजयी
धाराशिव, दि. २१(प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस आय आघाडीच्या दहा उमेदवारांनी वअजय मिळवला आहे.
या निवडणुकीत आघाडीच्या खालील उमेदवारांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १ अ मधून अक्षय लक्ष्मण जोगदंड, ३ ब मधून सचिन उर्फ राजाभाऊ पवार, ५ ब मधून सोनाली अमित उंबरे, ९ ब मधून संतोष उर्फ नाना घाटगे, ८ ब मधून प्रदीप प्रभाकर मुंडे, १९ ब मधून सौ. सोनाली रविंद्र वाघमारे, १९ क मधून सौ. ज्ञानेश्वरी अजित (राज) निकम, १५ ब मधून सौ. केशरबाई ज्ञानदेव करवर, १५ अ मधून सिद्धार्थ अंगुल बनसोडे तसेच १८ अ मधून पठाण उज्मासबा अजहरखान यांनी विजय संपादन केला.
या सर्व विजयी उमेदवारांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. धाराशिवच्या विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुख कारभारासाठी हे नेतृत्व प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या यशामागे अहोरात्र मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि मतदारांचे खासदार निंबाळकर यांनी आभार मानले. संघटनेच्या ताकदीमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या निवडणुकीत जे उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनी खचून न जाता पूर्वीप्रमाणेच जनतेच्या सेवेसाठी आणि संघटनेच्या मजबुतीसाठी जोमाने काम सुरू ठेवावे, असे आवाहनही खासदारांनी केले. संघर्ष हाच विजयाचा खरा मार्ग असून पुढील लढाईत यश निश्चितच आपलेच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा ठरणार असून, येणाऱ्या काळात नवनिर्वाचित प्रतिनिधी जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतील, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786