तुळजापूर बसस्थानकांना नवे नामाभिधान
मुख्य बसस्थानक ‘श्री तुळजाभवानी’, तर नुतनीकरण झालेले जुने बसस्थानक ‘छत्रपती संभाजी महाराज’
तुळजापूर : (अमजद सय्यद):धाराशिव विभागीय परिवहन महामंडळाने तुळजापूर शहरातील बसस्थानकांना नवे नामाभिधान दिले आहे. यानुसार, तुळजापूर येथील मुख्य बसस्थानकाला ‘श्री तुळजाभवानी बसस्थानक’ असे नाव देण्यात आले असून, नुतनीकरण पूर्ण केलेल्या जुन्या बसस्थानकाला आता ‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक’ म्हणून ओळखले जाईल.
या निर्णयामुळे यापुढे अधिकृत पत्रव्यवहार, नकाशे, तिकिटांवरील उल्लेख तसेच सर्व शासकीय व स्थानिक नोंदींमध्ये तुळजापूर मुख्य बसस्थानकाचा उल्लेख ‘श्री तुळजाभवानी बसस्थानक’, तर जुन्या नुतनीकृत बसस्थानकाचा उल्लेख ‘छत्रपती संभाजी महाराज बसस्थानक’ असा करण्यात येणार आहे.
परिवहन महामंडळाच्या परिपत्रकाद्वारे या बदलाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. तुळजापूर हे धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असल्याने या नामकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे. स्थानिक पातळीवरही या निर्णयाचे स्वागत होत असून, भाविक व नागरिकांसाठी यामुळे ओळख सुस्पष्ट व गौरवशाली ठरणार आहे
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












