वडगाव (सिद्धेश्वर) येथे उबाठा सेना व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मल्हार पाटील यांच्या हस्ते भाजपात पक्षप्रवेश
लोकमदत न्यूज
वडगाव (सिद्धेश्वर) येथील उबाठा सेनेचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश महादेव मुळे आणि काँग्रेसचे संजय आडगळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकासाच्या राजकारणावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश पार पडला.
यावेळी बोलताना मल्हार पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयाची ही नांदी असल्याचे सांगत सुरेश मुळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विकासाभिमुख धोरणे, जनतेशी थेट संवाद आणि प्रभावी नेतृत्वामुळे भाजपाची ताकद अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अनिल काळे, पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रमोद पाटील, बाळासाहेब वाडकर, बालाजी सातपुते, गोविंद माळी, बाबा जानराव, राहुल पांढरे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












