अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या धाराशिव दौऱ्यावर
धाराशिव (प्रतिनिधी) –
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्या दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
दौऱ्यादरम्यान ते दुपारी १२:३० वाजता ईटकुर (ता. कळंब) येथे आणि दुपारी १:३० वाजता पारगाव (ता. वाशी) येथे पाहणी करतील. यावेळी ठाकरे शेतकऱ्यांच्या व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेत नुकसानग्रस्तांना दिलासा देतील.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत गंभीर असून, पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मदतीसाठी शासनाकडे पाहत आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












