• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे

lokmadat news by lokmadat news
March 11, 2026
in राजकारण
0
0
SHARES
73
VIEWS

आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
पुण्यातील कचरा प्रक्रिया केंद्राला दिली भेट

धाराशिव लोकमदत न्यूज

पुणे येथील ग्रीन पृथ्वी सोल्युशन या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीस नगर परिषदेच्या शिष्टमंडळाने दि.१० मार्च रोजी भेट दिली. तसेच प्रक्रिया संयंत्र केंद्र ( प्रोसेस प्लांट) ची पाहणी केली. यावेळी कंपनीच्यावतीने आसाराम काळे यांनी शिष्टमंडळास कचऱ्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया केली जाते ? त्यामुळे कचऱ्याची समस्या दूर होऊन त्याचा सकारात्मक परिणाम काय होतो ? याची सविस्तरपणे माहिती दिली. तसेच धाराशिव येथील कचरा डेपो संदर्भात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील ? यासंदर्भात शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ज्या पद्धतीने पुणे येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून येथील कचऱ्याच्या समस्या सोडविल्या आहेत. अगदी तसाच प्रयोग धाराशिव येथील कचरा डेपोच्या संदर्भात केला जाईल असे आश्वासन काळे यांनी दिले. त्यामुळे
धाराशिवमधील कचरा डेपोतील कचऱ्यामुळे उद्भवलेल्या समस्या लवकरच सोडविल्या जातील. त्या संदर्भात नगर परिषदेकडून सकारात्मक ठोस आणि सकारात्मक पावले उचलली जात आहेत. लवकरच धाराशिवमधील कचरा डेपोमधील कचऱ्यावर प्रक्रिया (प्रोसेस) करून या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून निर्माण होणाऱ्या सर्व समस्या लवकरच निश्चितपणे संपुष्टात आणण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे व मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली आहे. तसेच या कचऱ्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्येवर कायमस्वरूपी इलाज केला जाणार आहे. विशेष म्हणजे नगर पालिका निवडणूक प्रचार दरम्यान दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीच्या दिशेने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे काकडे यांनी आवर्जून सांगितले. तसेच कचरा डेपो आणि कचऱ्यावरून होणारे राजकारण यापुढे कायमस्वरूपी निकाली काढण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असल्याचे नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी सांगितले. या शिष्टमंडळात नगराध्यक्ष काकडे यांच्यासह स्वच्छता सभापती अक्षय ढोबळे, नगरसेवक आकाश तावडे, राहुल काकडे, मुख्याधिकारी नीता अंधारे, उप मुख्याधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे आदी उपस्थित होते.

शहरवासियांची कचऱ्याच्या त्रासापासून कायमची मुक्तता करणार

धाराशिव शहरातील कचरा व कचरा डेपोचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना विशेषता ज्येष्ठ नागरिक व लहान बालकांना याचा प्रचंड आणि नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासापासून सुटका करण्यासाठी आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून या संदर्भात ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी मी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता फक्त शहरवासियांच्या हिताला प्राधान्य देत कचऱ्याचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे ठोस आश्वासन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी दिले.


SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची एकमताने निवड

Next Post

तुळजापुरात नवे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय वकील बांधव आणि पक्षकारांना दिलासा २५ पदांच्या निर्मितीलाही मान्यता मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

राजकारण

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

March 30, 2026
राजकारण

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026
राजकारण

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

March 27, 2026
राजकारण

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

March 26, 2026
राजकारण

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

March 26, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

March 20, 2026
Next Post

तुळजापुरात नवे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय वकील बांधव आणि पक्षकारांना दिलासा २५ पदांच्या निर्मितीलाही मान्यता मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कामगारच ठरला दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, ४२  हजारांच्या मुद्देमालासह  २ आरोपी जेरबंद

April 1, 2026

धाराशिवात डीजेवर कडक बंदी पोलिसांचा मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई अटळ!

April 1, 2026

एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ‘RuPay On-The-Go’ स्मार्ट कार्ड योजनेने प्रवाशांना मोठा दिलासा

April 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT