पद्मावती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
अध्यक्षपदी शकुंतला देवकते, उपाध्यक्षपदी रीमा नवगिरे तर सचिवपदी अनिता वाघमोडे
धाराशिव दि. ४ (प्रतिनिधी) :पद्मावती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिव या संस्थेच्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची महत्वाची सभा शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक सहकार अधिकारी आदिल आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था धाराशिव सौ. एस. कांबळे यांनी भूषविले.
या सभेमध्ये पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या निवडीत अध्यक्षपदी सौ. शकुंतला दीपक देवकते,उपाध्यक्षपदी सौ. रीमा नवनाथ नवगिरे,सचिवपदी सौ. अनिता मोहन वाघमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी संस्थेचे नूतन संचालक सौ. शकुंतला दीपक देवकते, सौ. रीमा नवनाथ नवगिरे, सौ. गीताश्री आकाश देवकते, सौ. साधना सुरेंद्रनाथ मालशेठवार, सौ. गंगोत्री शशिकांत कुराडे, सौ. सुनीता लिंबाजी देवकते, सौ. फातेमा अमजद सय्यद, सौ. भाग्यश्री शिवाजी रणखांब, सौ. अनिता मोहन वाघमोडे, सौ. सुमन बलभीम गरड यांच्यासह बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
निवडीच्या वेळी सर्व सन्माननीय नूतन संचालकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत भविष्यातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
या बिनविरोध निवडीमुळे पतसंस्थेच्या कार्यकारिणीला स्थैर्य लाभले असून येत्या काळात महिला संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
संपादक अमजद सय्यद 8390088786













