• #2776 (no title)
  • Home
lokmadatnews.com
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
lokmadatnews.com
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

lokmadat news by lokmadat news
March 30, 2026
in राजकारण
0
0
SHARES
33
VIEWS

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!


लोकमदत न्यूज ( नळदुर्ग अझहर शेख )

नळदुर्ग शहरात सध्या मतदार यादी पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू असताना, प्रशासनातील अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण प्रक्रिया गोंधळात सापडल्याचे चित्र दिसत आहे. ‘एकही मतदार वंचित राहणार नाही’ असा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना आपल्या भागातील बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) कोण आहे, हे शोधण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक प्रभागांमध्ये बीएलओंची कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षण सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही कर्मचारी ओळखपत्र न लावता येत असल्याने संशय अधिकच वाढला असून, “आमचे नाव मतदार यादीत राहील की कापले जाईल?” या प्रश्नाने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, प्रभागाच्या विकासासाठी आश्वासने देत निवडून आलेले नगरसेवक या महत्त्वाच्या प्रक्रियेत पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरिकांच्या अडीअडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे येण्याऐवजी लोकप्रतिनिधींनी ‘विश्रांती’ घेतल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आपल्या प्रभागात कोणता बीएलओ कार्यरत आहे, याची माहिती जाहीर करणे, संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे किंवा सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहोचवणे ही जबाबदारी पार पाडली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याऐवजी नेते केवळ निवडणुकीच्या वेळीच सक्रिय होतात का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नळदुर्गकरांनी आता केवळ आश्वासनांवर न राहता प्रत्यक्ष कृतीची मागणी केली आहे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी तातडीने बीएलओचे नाव, संपर्क क्रमांक आणि सर्वेक्षणाची वेळ जाहीर करावी, जेणेकरून एकही पात्र मतदार यादीतून वंचित राहणार नाही, अशी मागणी होत आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना, त्या हक्काच्या संरक्षणासाठीच नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याने लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने पारदर्शकता वाढवून ही प्रक्रिया सुलभ करावी आणि नगरसेवकांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवून सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

SendShareTweet
Previous Post

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

Related Posts

राजकारण

पंचायत समिती मधून समता नगर कडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आडवलेला रस्ता उखडून टाकण्याचा इशारा 

March 27, 2026
राजकारण

नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी संवर्धन कामांना मंजुरी : ऐतिहासिक किल्ल्याचे रुप पालटणार – आ. राणाजगजितसिंह पाटील

March 26, 2026
राजकारण

कोणत्याही परिस्थितीत महिलांना आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार – जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील

March 26, 2026
राजकारण

लोकमदत न्यूजचा दणका धाराशिव नगरपरिषदेकडून अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम

March 20, 2026
राजकारण

आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी

March 17, 2026
राजकारण

उच्चशिक्षित नगरसेविका पठाण यांची सभागृहात प्रभावी मांडणी शाळांसाठी वर्गखोल्या आणि ईदगाह मैदानाला कमान उभारणीची मागणी

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

March 30, 2026

धाराशिव भाजपचा नवा पायंडा हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

March 29, 2026

नळदुर्गमध्ये 48 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

March 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धाराशिव-उजनी रस्त्यावर भीषण अपघात – रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे धाराशिवनगर परिषदेचे अधिकृत उमेदवारी जाहीर हे आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव जिल्ह्यात खळबळ साई कला केंद्रातील महिलेसोबत प्रेम संबंधातून वाद.. तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरपरिषद निवडणूक छाननी नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर! मात्र थोडाफार बदल होऊ शकतो…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिवमध्ये डीवायएसपिंच्या पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
    आठ जणांना अटक..

    0 shares
    Share 0 Tweet 0

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • #2776 (no title)
  • Home

© 2025 LOKMADAT

  • ताज्या बातम्या
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result

© 2025 LOKMADAT