“वृक्षवल्ली आम्हा सोयरे” – स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचा प्रेरणादायी उपक्रम
धाराशिव (प्रतिनिधी) –
एकीकडे भरमसाट वृक्षतोड सुरू असताना दुसरीकडे समाजात आदर्श ठरेल असा उपक्रम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी सुरू केला आहे. कामाच्या व्यापातही वेळात वेळ काढून ते पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेरील लहान झाडांच्या कुंड्यांना स्वतःहून पाणी घालून त्यांची निगा राखत आहेत.
कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणारा अधिकारी स्वतः झाडांना पाणी घालत असल्याचे दृश्य नक्कीच कौतुकास्पद आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरी आम्हा जण” या उक्तीला साजेसा हा उपक्रम पाहून अनेकांनी प्रेरणा घ्यावी, असा संदेशच या कृतीतून दिला गेला आहे.
कार्यालयात प्रमुख पाहुण्यांसाठी बिसलेरी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असताना, झाडांनाही जीवनदान मिळावे यासाठी इज्जपवार यांनी पाणी देणे पसंत केले. हा क्षण न कळत लोकमदत न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या आसपासच्या झाडांची काळजी घेतली, तर स्वच्छ हवा व पर्यावरण संवर्धनास नक्कीच मोठा हातभार लागेल, हे यातून अधोरेखित झाले आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786














